​रितेश देखमुखने ढोलकीच्या तालावरच्या सेटवर केले बँकचोरचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 10:14 IST2017-06-06T04:44:13+5:302017-06-06T10:14:13+5:30

कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणे हे आता नवीन राहिलेले नाही. रितेश देशमुखने बँकचोर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ...

Promotion of bancalover made by Riteish Viewmukh Dholki Taal Set | ​रितेश देखमुखने ढोलकीच्या तालावरच्या सेटवर केले बँकचोरचे प्रमोशन

​रितेश देखमुखने ढोलकीच्या तालावरच्या सेटवर केले बँकचोरचे प्रमोशन

ाकारांनी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणे हे आता नवीन राहिलेले नाही. रितेश देशमुखने बँकचोर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती. बँकचोर या रितेश देशमुखच्या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. 
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात रितेश देशमुखने या कार्यक्रमातील स्पर्धक आणि या कार्यक्रमातील परीक्षकांसोबत खूप धमाल मस्ती केली. या कार्यक्रमाच्या सेटवर जितेंद्र नेहमी लहान मुलांना खाऊ देतो. पण या वेळी रितेश चिमुकल्यांसाठी खूप सारा खाऊ घेऊन आला होता. एवढेच नव्हे तर जितेंद्र आणि रितेश यांनी टीम बनवून ते रस्सीखेच हा खेळदेखील खेळले. यात रितेश आणि त्याची टीम विजेती ठरली.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. जेनेलिया आणि रितेशनला दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव रिहान असल्याने जेेनेलिया त्याला रिहानचे पप्पा अशीच हाक मारते. त्यामुळे या सेटवरदेखील लहान मुली त्याला याच नावाने हाक मारत होत्या. एवढेच नव्हे तर छोट्याशा समृद्धीने रितेशच्या एका चित्रपटातील संवाद म्हणत त्याचे मन जिंकले. 
रितेशला मराठमोळे जेवण खूप आवडते आणि त्यातही त्याला भाकरी आणि ठेचा खूप आवडतो. त्यामुळे खास सेटवर त्याच्यासाठी भाकरी, ठेचा मागवण्यात आला होता. त्याला त्याच्या आईने बनवलेली भाकरी आणि ठेचा खूप आवडतो असे त्याने यावेळी आवर्जून सांगितले. 
ढोलकीच्या तालावरच्या टीमने रितेशला मानाचा फेटा दिला तर जेनेलियासाठी छानशी पैठणी भेटवस्तू म्हणून दिली. 

Web Title: Promotion of bancalover made by Riteish Viewmukh Dholki Taal Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.