प्रियांकाला अमेरिकन टॉक शोची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:32 IST2016-01-16T01:16:18+5:302016-02-06T13:32:26+5:30
अमेरिकेत प्रियंकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिची 'क्वांटिको' ही मालिका तुफान गाजल्यानंतर आता तिला आणखी एका अमेरिकन टॉक ...

प्रियांकाला अमेरिकन टॉक शोची ऑफर
अ ेरिकेत प्रियंकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिची 'क्वांटिको' ही मालिका तुफान गाजल्यानंतर आता तिला आणखी एका अमेरिकन टॉक शोची ऑफर आल्याचे समजते. दरम्यान ती सध्या 'क्वांटिको'च्या शूटिंगमध्येच व्यस्त आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे निर्मात्यांनी ह्या मालिकेचे काही भाग वाढविण्याचे ठरवले आहे. प्रियंकाच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठीच 'क्वांटिको'च्या प्रोडक्शन हाऊसने या टॉक शोबद्दल तिला विचारल्याचे समजते. पिग्गी चॉप्सलाही कार्यक्रमाची कन्सेप्ट आवडली असून, ती तारखा जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.