​प्रियांका चोप्राला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका डान्ससाठी द्यावे लागले होते ५५ रिटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:17 IST2017-12-27T09:40:24+5:302017-12-27T15:17:09+5:30

जागतिक स्टार प्रियांका चोप्राने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अंदाज या ...

Priyanka Chopra had to pay for a dance at the beginning of her career, 55 Ritek | ​प्रियांका चोप्राला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका डान्ससाठी द्यावे लागले होते ५५ रिटेक

​प्रियांका चोप्राला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका डान्ससाठी द्यावे लागले होते ५५ रिटेक

गतिक स्टार प्रियांका चोप्राने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अंदाज या चित्रपटाने केली. अंदाज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अक्षय, प्रियांका आणि लारा तिघांच्याही भूमिकेचे कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी प्रियांका आणि लारा या दोघांनाही सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. प्रियांका आज अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत असून तिने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे स्थान निर्माण केले आहे. प्रियांकाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक केले जाते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यावर देखील तिचे चाहते प्रचंड फिदा आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रियांका पूर्वी चांगली डान्सर नव्हती. तिला डान्ससाठी अनेक रिटेक घ्यावे लागत असत. तिनेच ही गोष्ट तिच्या चाहत्यांना नुकतीच सांगितली आहे. 
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील एक मेहनती अभिनेत्री मानली जाते. तिने तिच्या मेहनीच्या जोरावर यश मिळवले आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आपल्या कधीही हार न मानण्याच्या स्वभावाला देते. प्रियांका सध्या चित्रीकरणाच्या निमित्ताने परदेशातच असते. ती नुकतीच भारतात आली होती आणि तिने स्टार प्लसवरील आगामी रिॲलिटी शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्यासोबत सेलिब्रिटी परीक्षक म्हणून चित्रीकरण केले. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी तिने एक गुपित तिच्या चाहत्यांना सांगितले. ती म्हणाली, “चित्रपटसृष्टीत मी प्रवेश केला. त्यावेळी सुरुवातीला मी खूपच वाईट डान्सर होते. मला आठवतंय एका नृत्याच्या शॉटसाठी मला ५५ टेक्स द्यावे लागले होते. राजू खान त्या गाण्याचे कोरियोग्राफर होते आणि ते मला म्हणाले होते की, मला ते नृत्य करायला अजिबातच जमणार नाही. मला असं म्हणून ते चक्क निघून गेले होते. त्यामुळे मी त्या दिवसानंतर माझ्या नृत्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि मी चांगली डान्सर होऊ शकते हे सिद्ध केले.
प्रियांका चोप्रा सेलेब्रिटी परीक्षक म्हणून इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या पहिल्या भागातच हजेरी लावणार आहे. 

Also Read : प्रियांका चोप्राने झी सिने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी घेतले तब्बल इतके पैसे

Web Title: Priyanka Chopra had to pay for a dance at the beginning of her career, 55 Ritek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.