Bigg Boss 16ची विजेती बनली प्रियंका चाहर चौधरी? सलमान खानसोबतचा फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:48 PM2023-02-12T12:48:37+5:302023-02-12T12:49:01+5:30

Bigg Boss 16 : बिग बॉस १६ मधील स्पर्धक प्रियंका चहर चौधरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान खान प्रियांकाचा हात वर करून बिग बॉस १६च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करत आहे.

Priyanka Chahar Chaudhary became the winner of Bigg Boss 16? A photo with Salman Khan went viral | Bigg Boss 16ची विजेती बनली प्रियंका चाहर चौधरी? सलमान खानसोबतचा फोटो झाला व्हायरल

Bigg Boss 16ची विजेती बनली प्रियंका चाहर चौधरी? सलमान खानसोबतचा फोटो झाला व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिेएलिटी शो बिग बॉस १६ (Bigg Boss 16)चा फिनाले आज पार पडणार आहे, त्यामुळे व्होटिंगला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी, चाहते आणि सेलिब्रिटी टॉप ५ स्पर्धकांमध्ये त्यांच्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. जिथे शिव ठाकरे आणि प्रियंका चहर ट्रॉफी जिंकणार आहेत असा अनेकांचा विश्वास आहे. दुसरीकडे, अर्चना गौतम हा सीझन आपल्या नावावर करणार असल्याचे अनेकांना वाटते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकांना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

वास्तविक, ट्विटरपासून फेसबुक पर्यंत एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियंका चाहर चौधरी आणि शिव ठाकरे सलमान खानसोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये सलमान खान प्रियांकाचा हात वर करून विजेत्याची घोषणा करताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर प्रियांका चाहर चौधरीने बिग बॉस १६ची ट्रॉफी जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. पण हे फोटो बनावट आहेत, हे एका चाहत्याने बनवले आहे. बिग बॉस १६चा विजेता आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच ग्रँड फिनालेमध्येच कळणार आहे.


बिग बॉस 16 चे नुकतेच एपिसोड प्रसारीत झाले. यादरम्यान त्याने टॉप ५ स्पर्धकांसह धमाका केला. त्याने सर्व सदस्यांना एक टास्क दिला, ज्यामध्ये एमसी स्टॅनला बाहेर काढण्यात आले. यानंतर शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांना टास्कमधून काढून टाकण्यात आले आणि शेवटच्या फेरीत शालीन भनोत आणि प्रियांका चाहर चौधरी यांच्यात लढत झाली. तथापि, शालीनने हे टास्क सहज जिंकले त्यानंतर रोहित शेट्टीने सांगितले की, बिग बॉसमधून थेट खतरों के खिलाडीमध्ये कोणीतरी जात असल्याचे पहिल्यांदाच घडत आहे. मात्र शालीन भनोत यांनी ही ऑफर नाकारली. शालीनने सांगितले की, तो टास्कमध्ये त्या वेळी करत असलेल्या या सर्व गोष्टींना घाबरतो.

Web Title: Priyanka Chahar Chaudhary became the winner of Bigg Boss 16? A photo with Salman Khan went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.