Pratyusha Banerjee 1st Death Anniversary: या कारणामुळे केली होती आत्महत्या, अशी बनली होती रसिकांची 'आनंदी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 13:35 IST2017-04-01T05:32:51+5:302017-04-01T13:35:24+5:30

छोट्या पडद्यावरील आनंदी ही भूमिका तुफान गाजली.आनंदी या भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. बालिका वधू मालिकेतून छोटी आनंदी बनत ...

Pratyusha Banerjee 1st Death Anniversary: ​​Suicide caused by this cause, was made of 'happy' | Pratyusha Banerjee 1st Death Anniversary: या कारणामुळे केली होती आत्महत्या, अशी बनली होती रसिकांची 'आनंदी'

Pratyusha Banerjee 1st Death Anniversary: या कारणामुळे केली होती आत्महत्या, अशी बनली होती रसिकांची 'आनंदी'

ट्या पडद्यावरील आनंदी ही भूमिका तुफान गाजली.आनंदी या भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. बालिका वधू मालिकेतून छोटी आनंदी बनत अविका गौरने बालविवाह विषयी रसिकांच्या डोळ्यांच अंजन घालण्याचे काम केले.अल्पावधीतच मालिका नंबर 1 मालिका बनली.त्यानंर मालिकेने लीप घेत मोठ्या आनंदीने एंट्री घेतली. एका काँटेस्टद्वारे प्रत्युषाची मोठ्या आनंदीसाठी निवड करण्यात आली. बालपणीची आनंदी तर घराघरात भावली होती. त्यानंतर मोठी झालेली आनंदी कशी असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आनंदीच्या भूमिकेला पूर्ण न्याय देत रसिकांचा विश्वास मिळवला. आनंदी म्हणून प्रत्युषा घराघरातून रसिकांच्या मनात पोहचली.बालिका वधू लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मात्र अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि काही वादामुळं प्रत्युषाला मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली. त्यानंतर झलक दिखला जाच्या  5 व्या सिझनमध्ये प्रत्युषा झळकली.मात्र पुन्हा एकका सगळ्यात वादग्रस्त शो  'बिग बॅास' या रिअॅलिटी शोमध्ये तिने एंट्री केली. या शोमध्येटीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी आणि प्रत्युषा बॅनर्जी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.वेगवेगळ्या भूमिका करत टीव्हीवर तिची काम सुरूच होते. मात्र अचानक 1 एप्रिल 2016 ला  प्रत्युषाने मानसिक तणावाखाली येवून आत्महत्या केली होती. प्रत्युषाने सगळ्यांना एप्रिल फुल बनवत गुगली टाकली असावी असेच त्यावेळी सगळ्यांना वाटले, मात्र तो दिवस प्रत्युषाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.तिच्या मित्र मंडळी आणि चाहत्यांमध्ये ही बातमी जशी जशी पसरत होती.त्यावेळी रिल लाईफमध्ये खंबीर दिसणा-या प्रत्युषाला रिअल लाईफमध्ये स्वत:चे आयुष्य संपवावेसे का वाटले? या एकाच प्रश्नाने चाहत्यांनाही अस्वस्थ करून सोडले होते.ती आज या जगात जरी नसली तरी तिच्या मित्र - मैत्रिंणींच्या आणि रसिकांच्या आठवणींत कायम राहणार आहे.

Web Title: Pratyusha Banerjee 1st Death Anniversary: ​​Suicide caused by this cause, was made of 'happy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.