प्रसाद ओकची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 13:28 IST2016-04-08T20:28:12+5:302016-04-08T13:28:12+5:30
रात्री उशीरा पर्यत झोप लागत नाही, खूप मोठे दडपण आले आहे, सतत विचारात असतो, कसे आणि काय होणार ही ...

प्रसाद ओकची उडाली झोप
र त्री उशीरा पर्यत झोप लागत नाही, खूप मोठे दडपण आले आहे, सतत विचारात असतो, कसे आणि काय होणार ही परिस्थीती दुसºया तिसºया कोणाची नसून आपला लाडका हर्षवर्धन म्हणजेच प्रसाद ओक या अभिनेत्याची झाली आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सने प्रसाद ओकशी संवाद साधला असता, प्रसाद म्हणाला, कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन मी स्वत: करणार आहे. त्यामुळे जस-जशी कच्चा लिंबू या चित्रपटाच्या शुटिंगचे शेडयुल जवळ येत आहे. तसतशी माझी झोप उडत चालली आहे. कारण या चित्रपटात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांसारखे मोठे कलाकार असल्यामुळे एक मोठे दडपण आले आहे. आणि या चित्रपटात अॅज अॅक्टर म्हणून रवी जाधव पहिल्यांचा काम करीत आहे. त्यामुळे एक दिग्गज दिग्दर्शक कलाकाराची भूमिका करणार आणि मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्यामुळे हे मोठे आव्हान माझ्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे सध्या माझी झोप तर उडाली आहे.