प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती झळकणार टिव्ही सिरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 13:39 IST2017-10-14T08:09:34+5:302017-10-14T13:39:34+5:30
प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रीत तुझी माझी, गोळाबेरीज, हिप हिप ...
.jpg)
प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती झळकणार टिव्ही सिरिजमध्ये
प रसाद ओक आणि पुष्कर श्रोती यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रीत तुझी माझी, गोळाबेरीज, हिप हिप हुर्रे, हाय काय नाय काय यांसारख्या अमेक चित्रपटांमध्ये आपल्याला प्रसाद आणि पुष्कर यांची जोडी पाहायला मिळाली आहे. त्यांच्या जोडीचे चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडतात. प्रसाद आणि पुष्कर खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांच्यात असलेली मैत्री अतिशय घट्ट असल्यानेच त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून प्रसाद आणि पुष्कर दोघेही आपापल्या कामात व्यग्र होते. प्रसादने कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. आता तर मामी फेस्टिव्हलमध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. प्रसादच्या या दिग्दर्शकीय इनिंगला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रसादप्रमाणे पुष्करने देखील नुकत्याच एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याच्या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. उबंटू असे या चित्रपटाचे नाव असून आपली शाळा वाचवण्यासाठी मुलांनी केलीली धडपड त्याने या चित्रपटात मांडली आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले आहे. पुष्कर आणि प्रसाद दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कामात व्यग्र असल्याचे त्यांना एकत्र काम करता आले नव्हते. पण आता ते दोघे लवकरच एकत्र काम करताना आपल्याला दिसणार आहेत.
![pushkar shrotri]()
प्रसाद आणि पुष्कर एका टिव्ही सिरिजमध्ये एकत्र झळकणार असल्याचे कळतेय. पुष्करच्या पत्नीनेच फेसबुकला पोस्ट करून याबाबत लिहिले आहे. पुष्करची पत्नी रुफिना श्रोतीने फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे की, माझे आवडते दोन कलाकार लवकरच एकत्र काम करत आहेत. त्यांना एकत्र काम करताना पाहाण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे आणि त्यासोबत तिने न्यू टिव्ही सिरिज हा हॅशटॅग दिला आहे.
ही टिव्ही सिरिज काय असणार, तसेच त्यात या दोघांची भूमिका काय असणार हे कळण्यासाठी काही दिवस तरी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
Also Read : प्रसाद ओकच्या हिरकणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात