/> मेघना या नावाने घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या मालिकेतील कॅरॅक्टरने अन सोज्वळ भूमिकेमुळे सार्वांचीच फेव्हरेट होऊन गेली. टिपिकल साड्यांमध्ये दिसणारी प्राजक्ता आता एकदमच ग्लॅम डॉल रुपात आली असुन तिने टोटली मेकओवर केला आहे. काकु बाई म्हणुन एकाच इमेज मध्ये अडकायचे नाही असे ती सांगतीये. सीएनएक्सशी बोलताना प्राजक्ता म्हणतेय, मला आता फिल्म्स साठी वेळ काढायचाय. प्रेक्षकांनी मला ट्रॅडिशनल लुक मध्ये पाहिले आहे. परंतू मी सगळ््या प्रकारच्या भुमिका करु शकते हे प्रेक्षकांना दाखवून द्यायचे आहे. हम भी किसीसे कम नही, सब कुछ कर सकते है असे म्हणताना ती जाम कॉन्फीडन्ट होती. मला आता दिग्दर्शकांच्या नजरेत यायचेय, लोकांनी मला वेगळ््या लुक मध्ये पहावे यासाठी मी फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमध्ये प्राजक्ता टॉप टू बॉटम अगदी ग्लॅमरस अन स्टनिंग दिसत आहे.
Web Title: Practical banana makeover
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.