पूजा बॅनर्जीला आहे या गोष्टीची आवड !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 12:33 PM2018-10-06T12:33:45+5:302018-10-08T06:00:00+5:30

‘कसौटी जिंदगी की’ 2 मालिकेत अनुराग बसूची बहीण निवेदिता बसूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही आपले सहकलाकार एरिका आणि पार्थ यांच्यासाठी स्वत: काही खाद्यपदार्थ तयार करून आणत असते.

Pooja Banerjee loves cooking Bengali food for Erica and Parth | पूजा बॅनर्जीला आहे या गोष्टीची आवड !

पूजा बॅनर्जीला आहे या गोष्टीची आवड !

googlenewsNext

‘कसौटी जिंदगी की’ सिझन 2 रसिकांच्या भेटीला आला आहे. मालिकेतील सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस उतरत असून अल्पावधीतच रसिकांची पंसती मिळवण्यात मालिकेला यश मिळाले आहे. तसेच मालिकेच्या सेटवर सगळ्या कलाकारांमध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण होते. त्यामुळे आपसुकच सगळेच सगळ्या गोष्टी एकमेकांसह शेअर करत असतात. यामुळे प्रत्येकाच्या आवड निवड ही कळतात. 

‘कसौटी जिंदगी की’ 2 पर्व नुकतेच सुरू झाले आहे. प्रत्येकजण एकमेकांसाठी नवीन होते तरी काही एकमेकांना ओळखतही होते. यातच सगळ्यांना जोडुन ठेवण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरली आहे. ती म्हणजे खाद्यपदार्थ होय,  मालिकेचा नायक अनुराग बसूची बहीण निवेदिता बसूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही आपले सहकलाकार एरिका आणि पार्थ यांच्यासाठी स्वत: काही खाद्यपदार्थ तयार करून आणत असते.

स्वत: बंगाली भाषिक असलेली पूजा सांगते की तिला पूर्वीपासूनच कुकिंगची आवड आहे. “मला खाद्यपदार्थ, विशेषत: बंगाली पदार्थ बनवायला फार आवडतात. माझ्या अतिशय व्यग्र चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून मी कुकिंगसाठी  मुद्दाम वेळ काढते; कारण आम्हा सर्वांनाच विविध पदार्थ खायला फार आवडतात. एरिकाला मिष्टी डोई खूप आवडतं. त्यामुळे शक्य असेल, तेव्हा मी तिच्यासाठी ते बनवतेच. आम्ही कोलकात्यात चित्रीकरण करीत होतो, तेव्हा पार्थ माझ्या आजोबांच्या घरी आला होता. कारण त्याला अस्सल बंगाली पदार्थ खायची फार आवड आहे,” असे पूजा म्हणाली.

या कलाकारांमधील मैत्रीचे प्रतिबिंब त्यांच्या पडद्यावरील कामगिरीत पडलेले दिसून येते. आता या मालिकेच्या कथानकाला लवकरच कलाटण्या मिळणार असल्याने प्रेक्षकांना भरपूर नाट्यमय प्रसंग पाहायला मिळतील, असे निर्मात्यांनी सांगितले. आगामी भागांमध्ये अनुराग आणि प्रेरणा यांच्यातील मैत्री अधिकच बहरत जात असल्याचेही पाहायला मिळणार आहे.


 

Web Title: Pooja Banerjee loves cooking Bengali food for Erica and Parth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.