​‘गोपी बहू’सोबतचे ते फोटो त्याला पडले महाग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:21 IST2016-05-12T13:51:48+5:302016-05-12T19:21:48+5:30

साथ निभाना साथियाँ या मालिकेचा सीन सुरु होता.. सारं काही व्यवस्थित सुरु होतं. सीनही झाला आणि दिग्दर्शकानं कट म्हटलं. ...

The photo with 'Gopi Bahu' fell on him! | ​‘गोपी बहू’सोबतचे ते फोटो त्याला पडले महाग !

​‘गोपी बहू’सोबतचे ते फोटो त्याला पडले महाग !

थ निभाना साथियाँ या मालिकेचा सीन सुरु होता.. सारं काही व्यवस्थित सुरु होतं. सीनही झाला आणि दिग्दर्शकानं कट म्हटलं.

तेवढ्यात मालिकेची ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी हिला भोवळ येऊ लागली. सेटवर ती जवळपास कोसळली होती. कसं तरी वाटू लागल्यानं तिला व्हॅनिटी व्हॅनपर्यंत दहा पावलं चालणंही शक्य नव्हतं.

मात्र त्यानंतर सेटवर जे घडलं ते पाहून सगळेच अचंबित झाले. मालिकेचा EP गुड्डू गोपी बहूसाठी धावून आला. क्षणाचाही विचार न करता त्यानं तिला उचलून घेतलं आणि व्हॅनमध्ये नेऊन ठेवलं.

हे सारं पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले असले तरी गोपी बहू आणि गुड्डू स्वतःमध्ये हरवले होते.मात्र खरा तमाशा तर नंतर झाला.

याबाबत गुड्डूच्या पत्नीला कळल्यानंतर तिनं गुड्डूला चांगलंच सुनावलं. दोघांमध्ये चांगलीच तू-तू-मैं-मैं झाली.

Web Title: The photo with 'Gopi Bahu' fell on him!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.