‘या’ टीव्ही अभिनेत्याचे दर्शन घेण्यासाठी लोक चक्क सेटवर जायचे; आज मिळेना काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 01:41 PM2017-11-05T13:41:15+5:302017-11-05T19:11:15+5:30

टीव्ही अभिनेता अरुण गोविल याने रामानंद सागर यांच्या रामायण (१९८७-१९८८) मध्ये काम केले होते. त्यांनी इतरही काही टीव्ही मालिकांमध्ये ...

People used to go to the sets to get a glimpse of the TV actor; Get work today! | ‘या’ टीव्ही अभिनेत्याचे दर्शन घेण्यासाठी लोक चक्क सेटवर जायचे; आज मिळेना काम!

‘या’ टीव्ही अभिनेत्याचे दर्शन घेण्यासाठी लोक चक्क सेटवर जायचे; आज मिळेना काम!

googlenewsNext
व्ही अभिनेता अरुण गोविल याने रामानंद सागर यांच्या रामायण (१९८७-१९८८) मध्ये काम केले होते. त्यांनी इतरही काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले. परंतु ‘रामायण’ या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. ही बाब स्वत: अरुण गोविल यांनीही बºयाचदा स्वीकारली आहे. रामायणातील त्यांची भूमिका त्याकाळी एवढी गाजली होती की, लोक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी चक्क शूटिंगच्या सेटवर जात असत. ही बाब फारच कमी लोकांना माहीत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.

त्याकाळी ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर प्रसिद्ध होत होती. तुम्हाला अभिषेक बच्चन स्टारर ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या चित्रपटातील तो सीन आठवत असेलच. जेव्हा टीव्हीवर ‘रामायण’ सुरू होते, तेव्हा प्रेक्षक चक्क टीव्हीवर फुले, हार अर्पण करतात. अगरबत्ती आणि धूपबत्ती लावून हात जोडतात. असाच काहीसा किस्सा अरुण गोविल यांच्याबाबतही घडायचा. अरुण गोविल यांनीच एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, शूटिंगदरम्यान बरेचसे लोक माझे आशीर्वाद घेण्यासाठी सेटवर येत असत. 

त्याचबरोबर अरुण गोविल हेदेखील मान्य करतात की, ‘रामायण’मुळेच त्यांना खरी ओळख मिळाली. कदाचित दुसºया मालिकांमध्ये त्यांना एवढी ओळख मिळाली नसती. तसेच त्यांनी हेदेखील सांगितले होते की, जेव्हा ‘रामायण’ मालिका बंद झाली त्यानंतर मला कुठलेही काम मिळाले नाही. खरं तर प्रेक्षकांनी अरुण गोविल यांना रामाऐवजी दुसºया अवतारात बघणेच पसंत केले नाही. अरुण यांनी ‘लव-कुश, कैसे कहूं, बुद्धा, अपराजिता, वो हुए न हमारे, प्यार की कश्ती में’ आदी प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 

Web Title: People used to go to the sets to get a glimpse of the TV actor; Get work today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.