'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पाशा पटेल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:27 AM2023-06-22T11:27:59+5:302023-06-22T11:29:06+5:30

Kon Honar Crorepati : पाशा पटेल यांच्याबरोबर 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग रंगणार आहे.

Pasha Patel is emotional in the memory of Gopinath Munde on the stage of 'Kon Honar Crorepati' | 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पाशा पटेल भावुक

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पाशा पटेल भावुक

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' पाशा पटेल हे हॉट सीटवर येणार आहेत. पाशा पटेल (Pasha Patel) 'कोण होणार करोडपती'चा खेळ फिनिक्स फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पाशा पटेल यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. 

ग्रामीण भागाचा विकास लक्षात घेता पाशा पटेल यांनी २००८ साली फिनिक्स फाउंडेशनची स्थापना केली. आता 'कोण होणार करोडपती'मध्ये जिंकलेली रक्कम पाशा पटेल  फिनिक्स फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी वापरणार आहेत. पाशा पटेल पहिल्यांदा एखाद्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये आले आहेत. ते 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून प्रेक्षकांना बांबूच्या लागवडीचे महत्त्व सांगणार आहेत. त्यांनी चक्क काही वस्तू मंचावर बरोबर आणल्या, ज्या बांबूपासून बनविल्या आहेत. बांबूच्या वस्तूंचा वापर आपण वाढवला पाहिजे, ह्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. 

पाशा पटेल यांना अश्रू झाले अनावर
सचिन खेडेकरांबरोबर गप्पा सुरू असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनी पाशा पटेल भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले. सांगितली. गोपीनाथ मुंडे यांनी पाशा पटेल यांना कशा प्रकारे मदत केली, याबद्दलची एक आठवण पाशा पटेल यांनी सांगितली. पाशा पटेल हे विमानाने प्रवास करत नाहीत. ते पहिल्यांदा विमानात बसले तेव्हा घडलेला विनोदी किस्सा त्यांनी 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर सांगितला. आता फिनिक्स फाउंडेशनसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कम जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच पाशा पटेल यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी विशेष भाग, २४ जून, शनिवारी रात्री ९ वाजता पाहायला मिळेल.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Pasha Patel is emotional in the memory of Gopinath Munde on the stage of 'Kon Honar Crorepati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.