‘खिचडी’च्या विशेष भागाचे व्हेनिसमध्ये चित्रण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 15:50 IST2018-04-04T10:20:25+5:302018-04-04T15:50:25+5:30
जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलीवुडही अपवाद राहिलेलं नाही.. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, पिरॅमिड, सिडनी ...

‘खिचडी’च्या विशेष भागाचे व्हेनिसमध्ये चित्रण?
ज भरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलीवुडही अपवाद राहिलेलं नाही.. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, पिरॅमिड, सिडनी हार्बर, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी अशा अनेक जगप्रसिद्ध वास्तूंचं दर्शन रसिकांना बॉलीवुडच्या सिनेमातून घडलंय.बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही फॉरेन लोकेशन्सचं दर्शन घडले आहे.आजपर्यंत विविध मालिकेत फॉरेन लोकेशन पाहायला मिळाले आहेत.आता त्यापाठोपाठ ‘खिचडी’ मालिकेतही फॉरेन लोकेशनचे दर्शन रसिकांना घडणार आहे.कारण या मालिकेचे देशातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात चाहते आहे.त्यामुळे खिचडी मालिकेच्या खास भागाचे शूटिंग हे व्हेनिस येथे करण्यात आले.मात्र मालिकेच्या कथेनुसार काही भागाचे शूटिंग व्हेनिसमध्ये होवू शकले नाही. यावेळी या मालिकेच्या निर्मात्यांना पारेख कुटुंबियांना व्हेनिसमधील कालव्यांची सफर घडवून आणणा-या गोंडोलांची सफर घडवून आणायची होती. ते शक्य झाले नाही म्हणून या भागाचे आऊटडोअर शूट रद्द करावे लागले आणि त्याचे स्टुडिओतच चित्रण करावे लागले.व्हेनिसचा फिल यावा म्हणून वसई येथेच व्हेनिसप्रमाणे एक खास सेट उभारण्यात आला होता.मालिकेचे निर्माते जे. डी. मजेठिया यांनी सांगितले,“वेळेच्या अभावी आणि दळणवळणाच्या सुविधांतील त्रास लक्षात घेता व्हेनिसमध्ये या मालिकेचं चित्रीकरण करता आलं नाही, त्यामुळे आम्ही थोडे निराश नक्कीच झालो आहोत. तरीही आम्ही वसईत या शहराची उत्कृष्ट प्रतिकृती उभी केली असून त्यामुळे हा सेट व्हेनिसच्या दृष्यांना नक्कीच न्याय देईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.”
'खिचडी' ह्या मालिकेचे पुनरागमन स्टार प्लसवर नवीन वर्षात मूळ कलाकारांसोबत म्हणजेच सुप्रिया पाठक, अनंग देसाई, राजीव मेहता सोबत होणार असून या शोच्या संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट उघडण्यात येणार आहे.पहिले रेस्टॉरंट गुजरातमध्ये तर त्यानंतर पंजाब आणि राजस्थानमध्ये रेस्टॉरंट उघडण्याचा त्यांचा मानस आहे.2000 च्या सुरुवातीला 'खिचडी' ही मालिका तुफान यशस्वी ठरली होती आणि आता हा शो परत येत असून प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल अधिक उत्सुकता पाहायला मिळणार आहे. ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली.नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता.आत पुन्हा पारेख कुटुंबीय आणि त्यांचे नवे धाडसी प्रयोग प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार असून ते पाहणे ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.