'माझं नाक कापू नकोस..', करिअरच्या सुरुवातीला श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:13 PM2023-05-31T17:13:46+5:302023-05-31T17:16:11+5:30

पलक तिच्या आईच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा त्यांच्यातील बॉन्डिंगबद्दल ती उघडपणे बोलत असते.

Palak tiwari reveals why shweta said her naak mat katana | 'माझं नाक कापू नकोस..', करिअरच्या सुरुवातीला श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद

'माझं नाक कापू नकोस..', करिअरच्या सुरुवातीला श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद

googlenewsNext

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पलक तिवारी अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा एक्स पती राजा चौधरीची मुलगी आहे. पलक तिच्या आईच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा त्यांच्यातील बॉन्डिंगबद्दल ती उघडपणे बोलत असते. अलिकडेत, तिने त्याच्या करिअरबद्दल तिच्या आईचे मत आणि  तिच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगितले.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिवारीने सांगितले, तिची आई श्वेता तिवारी तिला अनेकदा दिल्लीत घेऊन जायची, पण प्रत्येक वेळी ती फॅशन वीकमध्ये कशी आली याबद्दल बोलली. पलकने असेही म्हणाली की, श्वेता आई म्हणून खूप स्ट्रिक होती कारण ती त्यावेळी किशोरवयीन होती. त्यामुळे आईला दोष न देता ती हळूहळू तिच्या जवळ कशी गेली हे सांगितलं. इतकंच नाही तर तिच्या आईने करिअरच्या सुरुवातीला तिला कसा सल्ला दिला हेही पलकने सांगितलं.

पलकने उघड केले की श्वेताने तिला इंडस्ट्रीमध्ये तिची इमेज खराब न देण्याचा सल्ला कसा दिला. पलक जेव्हा काही करते तेव्हा तिला तिच्या आईचा विचार करते. पलक म्हणाली, "जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा तिने (आई) मला 'नाक कापू नकोस' आणि मला वाटतं की, मी काहीतरी करत असताना, ती म्हणते, 'तू काय करत आहेस? खूप घरात आई-बाबा त्यांच्या मुलांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं माझी आई तशी नाहीय. दरम्यान श्वेताने पलकला सिंगल मदर म्हणून वाढवलं आहे. आई आणि लेकीमधील बॉन्डिंग अनेकवेळा दिसून येत. दोघीही सोशल मीडियावर एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.   
 

Web Title: Palak tiwari reveals why shweta said her naak mat katana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.