निव्वळ काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी मराठी संस्कृती घालवू नका,आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:22 PM2021-05-24T13:22:25+5:302021-05-24T13:26:48+5:30

अभिनेत्री तन्वी मुंडेसह आशयने एक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला. व्हिडीओला ‘उचलले ना मी तुला… 50 किलो स्क्वॉट चॅलेंज’ असं कॅप्शनही दिले आहे.

Pahile Na Mi Tula Fame Aashay Kulkarni Troll Due To Viral Video | निव्वळ काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी मराठी संस्कृती घालवू नका,आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

निव्वळ काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी मराठी संस्कृती घालवू नका,आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

googlenewsNext

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. कलाकारमंडळी देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. चाहत्यांच्या संपर्कात असतात. कलाकारांनाही ते साकारत असलेली भूमिका रसिकांना कितपत पसंतीस पात्र ठरत आहे की नाही याचाही अंदाज सोशल मीडियावर लवकर कळतो. मात्र अनेकदा सोशल मीडियाचा वापर कलाकरांसाठी डोकेदुखी ठरतो. नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.सध्या नेटीझन्सकडून कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहेत. कलाकारांची कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर आली की, त्यावर काही नेटीझन्स अतिशय असभ्य भाषेत टीका करताना दिसतात. गेल्या काही दिवसांत ट्रोल करणा-यांना कलाकरांनीची गप्प न राहता वेळीच उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

 

लॉकडाऊनमुळं ‘पाहिले ना मी तुला’ मालिकेचं शूटिंग सध्या गोव्यात सुरु आहे. शूटिंगमधून वेळ मिळताच कलाकार धम्माल मस्ती करताना दिसतात. एरव्ही ऑनस्क्रीन रसिकांचे मनोरंजन करणारे कलाकार सध्या ऑफ स्क्रीनही रसिकांची वाहवा मिळवताना दिसतात. कॉमेडी व्हिडीओ करत सोशल मीडियावर शेअर करतात. असाच एक मेजेशीर व्हिडीओ अभिनेता आशय कुलकर्णीनेही शेअर केला आहे. 

अभिनेत्री तन्वी मुंडेसह आशयने एक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला. व्हिडीओला ‘उचलले ना मी तुला… 50 किलो स्क्वॉट चॅलेंज’ असं कॅप्शनही दिले आहे. मजेशीर अंदाजात शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे एका युजरने व्हिडीओवर अशी काही कमेंट केली की, ती वाचून आशयनेही ट्रोल करणा-याची बोलती बंद केली आहे.

युजरने व्हिडीओ पाहून म्हटले की, “लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी मराठी संस्कृतीची अशी इज्जत घालवू नका”. यावर  आशय संतापला ट्रोल करणा-याला जबदरस्त उत्तर दिले. आशनयने म्हटले की, “अजिबात संस्कृती आणि इज्जत घालवली नाहीये . आधी लक्ष वेधून घेण्यासाठी अशा कमेंट्स करणं बंद करा.” अशी प्रतिक्रिया देत त्यांची बोलती बंद केली आहे.

'पाहिले ना मी तुला' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे.अभिनेता  शशांक केतकर,आशय कुलकर्णी,  अभिनेत्री तन्वी मुंडे यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे. 
 

Web Title: Pahile Na Mi Tula Fame Aashay Kulkarni Troll Due To Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.