विराफने शोधला हा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 18:03 IST2016-11-09T18:03:47+5:302016-11-09T18:03:47+5:30
विराफ फिरोज पटेल नामकरण या मालिकेत एक प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकतीच त्याला एक दुखापत ...

विराफने शोधला हा पर्याय
व राफ फिरोज पटेल नामकरण या मालिकेत एक प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकतीच त्याला एक दुखापत झाली आणि त्यामुळे त्याचा पाय मुरगळला. या मालिकेत एक अॅक्शन दृश्य चित्रीत करायचे होते. ते दृश्य स्वतः चित्रीत करण्याचे विराफने ठरवले. पण चित्रीकरणादरम्यान त्याला बांधलेला बेल्ट सैल झाला आणि तो जमिनीवर कोसळला. यामुळे विराफच्या पायाला दुखापत झाली. पण तरीही तो सुट्टी न घेता मालिकेचे चित्रीकरण करत आहे. विराफला व्यायाम करायला खूप आवडतो. व्यायाम केल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नाही. पण पायाला दुखापत झाल्याने व्यायाम न करण्याचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला आहे. पण विराफ व्यामाशिवाय राहूच शकत नाही. विराफला मालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमुळे व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या व्यायामाचे सगळे साहित्य मालिकेच्या सेटवरच आणून ठेवले आहे. दुखापत झाली असूनही तो कमी वजनाच्या डम्ब्ल्सचा वापर करून व्यायाम करत आहे. पण त्याला यामुळे समाधान मिळत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या मालिकेच्या सेटवर व्यायाम न करता ध्यानधारणा करण्याचे ठरवले आणि त्याच्या ध्यानधारणाच्या गुरुंना मालिकेच्या सेटवरच बोलावले. सध्या तो हलक्या साधनांसह व्यायाम करत आहे. तसेच ध्यानधारणाही करत आहे. यामुळे त्याच्या मनाला सध्या शांतता मिळत आहे. याविषयी तो सांगतो, "अपघातामुळे मला व्यायाम करायला मिळत नसल्याने मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण याचा परिणाम मी माझ्या कामावर होऊ दिला नाही. मी सध्या हलक्या साधनांसोबत व्यायाम करत आहे तसेच ध्यानधारणादेखील करत आहे. यामुळे माझे मन शांत झाले आहे."
![viraf patel doing exercise on set]()