‘ऑनस्क्रीन’ आजी आणि नातवाची ‘रिअल’ केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 14:02 IST2017-12-20T08:32:15+5:302017-12-20T14:02:15+5:30

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा ...

'Onscreen' grandmother and 'real' chemistry | ‘ऑनस्क्रीन’ आजी आणि नातवाची ‘रिअल’ केमिस्ट्री

‘ऑनस्क्रीन’ आजी आणि नातवाची ‘रिअल’ केमिस्ट्री

ट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील इक्यावन मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते. यापैकी या मालिकेतील आजी आणि नातवाचे नाते अनोखे असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत आजी लीलाची भूमिका अभिनेत्री कविता वैद्य साकारत आहेत. तर त्यांच्या नातवाच्या म्हणजेच सत्याच्या भूमिकेत नमिष तनेजा पाहायला मिळतो आहे.नमिष तनेजासोनत कविता वैद यांची केमिस्ट्री सध्या रसिकांना चांगलीच भावते आहे. या दोघांचे ऑनस्क्रीन आजी आणि नातवाचं नातं रसिकांना भावतं आहे.दोघांमधील नातं हे रिअल आजी आणि नातवासारखंच आहे. इक्यावन या मालिकेत दोघंही रसिकांना भावतायत. याआधीही कविता वैद्य आणि नमिष तनेजा यांनी एकत्र काम केलं आहे. पुन्हा एकदा एकत्र काम करताना दोघंही आनंदी आहेत. इक्यावनच्या सेटवर एक कुटुंब मिळाल्याची भावना कविता वैद्य यांनी व्यक्त केली आहे. नमिष तर माझ्या खऱ्या नातवासारखाच आहे असंही त्यांनी म्हटले आहे.सेटवर आजी नातवासारखेच वागतो असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.नमिषसोबत काम करायला छान वाटतं असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.लीलाची भूमिका माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्याची आजी साकारायला आवडत आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

Also Read:नमिष तनेजा घेणार देशभरातील 51 चाहत्यांची भेट!

एक्कावन ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत.या मालिकेची संकल्पना ही आजच्या इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या मालिकेतील नायिका ही टॉम बॉय असून तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तिचे वडील, काका, मामा आणि आजोबा यांनी मिळून तिचा सांभाळ केला आहे. या मालिकेत प्राची तेहलान मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या आधी तिने 'दिया और बाती' या मालिकेत काम केले होते. एक्कावन या मालिकेतील प्राचीच्या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.एक्कावन या मालिकेत नमिष तनेजा एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

Web Title: 'Onscreen' grandmother and 'real' chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.