केवळ 75 रू होती अभिनेत्री पल्लवी प्रधानची पहिली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 12:15 IST2017-11-03T06:45:21+5:302017-11-03T12:15:21+5:30
अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत. शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने ...

केवळ 75 रू होती अभिनेत्री पल्लवी प्रधानची पहिली कमाई
अ िनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत. शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो. त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.म्हणूनच ‘जीजी माँ’ मालिकेत उत्तरादेवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचा रंगमंचावर काम केल्यानंतर टीव्ही मालिकांकडे वळल्या.एकांकिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस प्रारंभ केलेल्या पल्लवी प्रधानला पहिल्या मानधनापोटी केवळ 75 रुपयांचा धनादेश मिळाला होता. तीन तासांच्या चित्रपटासाठी शेकडो रुपये मोजावे लागण्याच्या काळात केवळ 75 रुपयांवरून प्रारंभ करून रंगमंचाकडून रुपेरी पडद्याच्या दिशेने केलेला व्यावसायिक प्रवास आणि यादरम्यान कमावलेले नाव ही तिची मोठीच कमाई म्हणावी लागेल.पल्लवी प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री असून तिनं फक्त मराठी रंगमंचच नाहीतर गुजराती रंगमंचही गाजवला. गुजराती रंगमंचावर अभिनय करून तिने आता हिंदी टीव्ही मालिकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ही कामगिरी तिने कठोर परिश्रमांनी साध्य केली आहे.यासंदर्भात पल्लवी सांगते, “तुम्हाला यश रातोरात मिळत नसतं.आपल्याला त्याचा ध्यास घ्यावा लागतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात. मला नाटकांतून कामं करण्याची आवड होती आणि नाटकांतील भूमिका रंगवणं मला आवडत होतं.परंतु प्रत्येक वेळी तितक्याच परिपूर्णतेने काम करणं ही अवघड गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या कामातून आनंद आणि समाधान मिळत असेल आणि त्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण होत असेल तर पैसा दुय्यम ठरतो, असं मला वाटतं. आज पर्यंत वाट्याला आलेल्या कामाची संधीचे मी सोनं करत मिळालेलं काम मनापासून केले. त्यामुळे मी केलेल्या प्रत्येक कामातून मला एक वेगळेच समाधान मिळाले आणि त्याच गोष्टीचा मला आज जास्त आनंद असल्याचे तिने सांगितले.” रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत लीलया वावरत पल्लवी प्रधानने यश मिळवलं आहे.