'आजच्या दिवशी त्या सगळ्यांची उजळणी होते..', 'रंग माझा वेगळा'मधील अभिनेत्रीची गुरुपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:31 PM2023-07-03T19:31:17+5:302023-07-03T19:31:36+5:30

Rang Maza Vagla Fame Vaishali Bhosale : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अश्विनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली भोसलेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'On this day, all those are revised..', special post of the actress from 'Rang Maza Vegla' on the occasion of Gurupurnima | 'आजच्या दिवशी त्या सगळ्यांची उजळणी होते..', 'रंग माझा वेगळा'मधील अभिनेत्रीची गुरुपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट

'आजच्या दिवशी त्या सगळ्यांची उजळणी होते..', 'रंग माझा वेगळा'मधील अभिनेत्रीची गुरुपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट

googlenewsNext

रंग माझा वेगळा मालिकेत अश्विनीच्या भूमिकेतून अभिनेत्री वैशाली भोसले (Vaishali Bhosale) घराघरात पोहचली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनय क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंचे आभार मानले आहेत आणि त्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वैशाली भोसले हिने सोशल मीडियावर तिच्या गुरुंसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करताना काय गंमत वाटायची ना आपल्या आवडत्या बाईंना किंवा सरांना छान एखादं गुलाबाचं फुलं दिलं की आपली. गुरुौर्णिमा साजरी व्हायची.. कॉलेजमधली गुरुपौर्णिमा म्हणजे इव्हेंटच असायचा..आपल्या आवडत्या मॅडम किंवा सरांसोबत छान वेळ घालवायचा शुभेच्छा द्यायच्या.. आणि हो गुलाबाचं फुल mandatory..!! कॉलेज संपल्यावर मधल्या काळात काम -धंदा नोकरी ,संसार यात जुंपल्यावर फोन वरून किंवा message करून गुरुपौर्णिमेच्या ही शुभेच्छा देण्याची नवीन प्रथा सुरू झाली.. (शुभेच्छा न देण्यापेक्षा गुरू ची आठवण असते हे ही नसे थोडके) आणि सगळं व्यवस्थित स्थिर स्थावर झाल्यावर आता थेट गुरूगृही जाऊन गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली..

आयुष्यात गुरू महत्वाचा 
ती पुढे म्हणाली की, थोडक्यात काय..आयुष्यात गुरू महत्वाचा असं मी कायम म्हणते.. म्हणजे अलीकडे ती समज निर्माण झाली असावी..आयुष्यात खूप टक्के टोणपे खाऊन जेव्हा एखादी गोष्ट मिळते किंवा ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा पदोपदी गुरू नी दिलेले सल्ले आठवतात..आणि आजच्या दिवशी त्या सगळ्यांची उजळणी होते..ज्यांच्यामुळे मी आज अभिनय क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवण्याचा प्रयत्न करतेय ते माझे गुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री रमेश मोरे सर..फक्त अभिनयच नाही तर उत्तम माणूस म्हणून जगण्याची योग्य दिशा सर कायम दाखवत आलेत.. पण सरांसोबतच नकळत ज्यांचे संस्कार माझ्यावर झालेत आज त्यांच्याविषयी सांगायला मला नक्कीच आवडेल..आताच्या तुलनेत पुर्वी सर फारच कडक होते. त्यांच्या समोर जायला सुध्दा धडकी भरायची..तेव्हा आमचा सरांमधला दुवा असायच्या यशश्री मॅडम सरांच्या मिसेस. त्या असल्या की आम्ही बिनधास्त. सरांपर्यंत काही पोहोचवायचं असेल त्यांना काही सांगायचं असेल तर आमची धाव मॅडम कडे.कित्येक वेळा आमच्या वाटणीचा ओरडाही मॅडम नी खाल्लाय. सरांसोबत काम करत असले तरी मी मात्र शेपटासारखी मॅडमच्या मागे असायचे.. त्यांच्या सोबत सगळं शेअर करायचे ( म्हणजे अजूनही करते) खूप गप्पा मारायचे त्या ही पेक्षा त्यांचं ऐकायचे.. त्यांना observe करायचे.. त्या कसं काम करतात.. मुळात कसं बोलतात.. त्यांच्यासारखं शांत, संयमी, साधं राहणं मला कधीच जमलं नाही जमणार ही नाही खरं तर.. कधी त्यांचा माझ्यावर प्रभाव पडत गेला माहीत नाही पण सरांचा जेवढा प्रभाव आहे कदाचित त्या पेक्षा थोडं जास्त यशश्री मॅडम चा प्रभाव असावा..
आज ही मला माझ्या कविता इतक्या पटकन आठवणार नाहीत पण सरांच्या आणि यशश्री मॅडमच्या कविता पटकन आठवतील..

नकळतपणे तुम्ही ही मला घडवत होतात 
आयुष्यात अनेक महत्वाच्या टप्प्यांवर जसे सर मार्गदर्शन करतात तसेच मॅडमचा सल्ला ही मला तितकाच मोलाचा वाटतो. कधी कधी सरांना माझं म्हणणं पटत नाही पण मॅडम समजून घेतात.. आज अनेक वर्षांनंतर मला याची जाणिव होतेय.. नकळतपणे तुम्ही ही मला घडवत होतात किंवा मी तुमच्या सोबत घडत होते.कधी तुम्ही मैत्रीण म्हणून तर कधी मोठी बहीण म्हणून मला कायम समजून घेत आलात.आजच्या या गुरुौर्णिमेच्या दिवशी सर तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्ही माझे सर आहात गुरु आहात याचा मला खूप अभिमान वाटतो त्याच बरोबर यशश्री मॅडम तुम्हाला ही गुरुौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.. माझ्या सारख्याच अनेकांच्या आयुष्यात सरांसोबत तुमचंही एक वेगळं स्थान असेल हे निश्चित, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: 'On this day, all those are revised..', special post of the actress from 'Rang Maza Vegla' on the occasion of Gurupurnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.