OMG : ​डॉक्टर गुलाटीला मिळाली सलमानची साथ, या ‘शो’मध्ये दिसतील एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 13:20 IST2017-06-02T07:50:29+5:302017-06-02T13:20:29+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खानने आपला आगामी चित्रपट ‘ट्यूबलाइट’चे प्रोमोशन सुरु  केले आहे. गेल्या काही काळापासून टीव्ही शोज चित्रपटांच्या प्रमोशनसाठी ...

OMG: Doctor Gulati gets along with Salman, together in this show, will appear together! | OMG : ​डॉक्टर गुलाटीला मिळाली सलमानची साथ, या ‘शो’मध्ये दिसतील एकत्र !

OMG : ​डॉक्टर गुलाटीला मिळाली सलमानची साथ, या ‘शो’मध्ये दिसतील एकत्र !

लिवूडचा दबंग सलमान खानने आपला आगामी चित्रपट ‘ट्यूबलाइट’चे प्रोमोशन सुरु  केले आहे. गेल्या काही काळापासून टीव्ही शोज चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सलमान खान सुनील ग्रोवर आणि त्यांची टीमसोबत शो शूट करणार आहे. 
सलमान खान ‘ट्यूबलाइट’च्या प्रोमोशनसाठी सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रासोबत शूट करण्याच्या तयारीत आहे. कपिलसोबत झालेल्या वादानंतर या कलाकारांनी त्याच्या शोला रामराम ठोकला होता. सध्या सुनील सोनीच्या शोमध्ये आपल्या टीमसोबत कॉमेडी करताना दिसत आहे. 
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, नुकताच एक प्रोमो शूट झाला असून तो लवकरच आॅन-एअर असेल. सुनील ग्रोवर या प्रोमोत सहभागी नव्हता कारण तो एका लाइव्ह इव्हेंटसाठी प्रवास करीत आहे. हा दोन तासाचा एक स्पेशल एपिसोड असेल, ज्यात ते सर्व कलाकार असण्याची शक्यता आहे. 
विशेष म्हणजे या दोन तासाच्या स्पेशल एपिसोडमध्ये सलमान खान सोबत ‘ट्यूबलाइट’ची टीमचे काही सदस्यदेखील दिसतील. 
नुकतेच असे ऐकण्यात आले आहे की, कपिल शर्माचा शो आॅफ एअर होणार होता, मात्र सलमान खानने असे होऊ दिले नाही.  

Web Title: OMG: Doctor Gulati gets along with Salman, together in this show, will appear together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.