Ohh no: हिना खान नाहीतर संजीदा शेख साकारणार 'चंद्रकांता'ची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 13:50 IST2017-01-05T13:49:16+5:302017-01-05T13:50:24+5:30

'ये रिश्ता क्या केहलाता है' फेम हिना खान चंद्रकांतामध्ये मुख्य भूमिका करणार असल्याचे बोलले जात होते.एकेकाळी दुरदर्शनवर सुपरहिट ठरलेली ...

Ohh no: Hina Khan or the role of Chandrakanta will play Sanjida Shaikh | Ohh no: हिना खान नाहीतर संजीदा शेख साकारणार 'चंद्रकांता'ची भूमिका

Ohh no: हिना खान नाहीतर संजीदा शेख साकारणार 'चंद्रकांता'ची भूमिका

'
;ये रिश्ता क्या केहलाता है' फेम हिना खान चंद्रकांतामध्ये मुख्य भूमिका करणार असल्याचे बोलले जात होते.एकेकाळी दुरदर्शनवर सुपरहिट ठरलेली या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.त्यामुळे शीखा स्वरूपप्रमाणेच हिना खानच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते असेही बोलले जात होते.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षराच्या भूमिकेने लोकप्रिय ठरलेली हिना खान चंद्रकांताला पूर्वीप्रमाणे पाॅप्युलारिटी मिळवून देऊ शकते असेही चर्चा होत्या.मात्र आता हिना खान नाही तर संजीदा शेख ही टीव्ही अभिनेत्री चंद्रकांतामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची कंन्फर्म बातमी मिळतेय. 

आजवर कोणत्याही ऐतिहासिक मालिकेत भूमिका न साकारलेली  संजिदा शेखची ‘चंद्रकांता’ या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिकेसाठी वर्णी लागली आहे.  हिना खान प्रमाणेच ही भूमिका सुर्वीन चावला किंवा शिल्पा आनंद साकारणार अशाही अफवा उठल्या होत्या. मात्र या सगळ्या बातम्या आता फोल ठरल्या आहेत संजीदा शेख सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे तिने सध्या यांवर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. योग्यवेळ येताच याविषयी माहिती देणार असल्याचेही संजिदाने सांगितले आहे.‘चंद्रकांता- प्रेम या पहेली?’ नावाच्या या मालिकेचे प्रोमो वाहिनीवरून प्रसारित होऊ लागले आहेत.मालिकेची कथा ही दोन प्रेमिकांची फॅण्टसी प्रेमकथा आहे. देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या 'कल्पनारम्य' कादंबरीवर ही मालिका आधारित आहे. ‘देवों के देव- महादेव’ या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हा यांनी पुन्हा एकदा‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली आहे. मार्च महिन्यात चंद्रकांताचे प्रसारण करण्यात येईल असे मालिकेच्या टीमने सांगितले आहे.

Web Title: Ohh no: Hina Khan or the role of Chandrakanta will play Sanjida Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.