'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:15 AM2019-02-26T07:15:00+5:302019-02-26T07:15:00+5:30

सासरा-जावईमधील प्रेम व द्वेषाला दाखवणारी सोनी सबवरील मालिका 'मंगलम दंगलम' प्रेक्षकांना अचंबित करण्‍याची कोणतीच संधी सोडत नाही.

Occupation of King Sakalech's house occupied in 'Mangalam Dangalam' | 'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा

'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा

googlenewsNext

सासरा-जावईमधील प्रेम व द्वेषाला दाखवणारी सोनी सबवरील मालिका 'मंगलम दंगलम' प्रेक्षकांना अचंबित करण्‍याची कोणतीच संधी सोडत नाही. आगामी एपिसोड्समध्‍ये संजीव सकलेचा (मनोज जोशी) कुट्टी कुटुंबाला संकटात टाकण्‍याचा प्रयत्‍न करतो. पण तोच स्‍वत: रचलेल्‍या जाळ्यात अडकतो. 

अर्जुन (करणवीर शर्मा) लोकांच्‍या घरांवर कब्‍जा करणाऱ्या कब्‍जा किंगविरोधात केस लढवत असतो. संजीव सकलेचा या स्थितीचा फायदा घेण्‍याची योजना आखतो आणि कब्‍जा किंगला कुट्टी कुटुंबाच्‍या घरावर कब्‍जा मिळवून त्‍यांना घाबरवण्‍यास सांगतो. पण काहीशा गैरसमजूतींमुळे कब्‍जा किंग सकलेचाच्‍या घरामध्‍ये पोहोचतो. कोणत्‍याही घरावर कब्‍जा घेण्‍यापूर्वी घरमालकाला प्रेमाने समाजवण्‍याचा नियम असलेला कब्‍जा किंग रूमीला (मनिषा रावत) देखील त्‍याच पद्धतीने विचारतो. रूमीला वाटते की ते पेंटर्स आहेत, म्‍हणून ती त्‍यांना घरावर कब्‍जा घेण्‍याची परवानगी देते. कब्‍जा किंग आता त्‍या घरामध्‍ये स्‍थायिक होऊन सर्वांना त्‍याची खुशामत करण्‍यास सांगतो. अर्जुन सकलेचा कुटुंबाला कब्‍जा किंगच्‍या तावडीतून कशाप्रकारे वाचवतो, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
करणवीर शर्मा म्‍हणाला, 'अर्जुन कब्‍जा किंगच्‍या विरोधात केस लढवत असतो आणि कब्‍जा किंगला सकलेचा कुटुंबावर कब्‍जा केलेले पाहून त्‍याला धक्‍काच बसतो. आता कब्‍जा किंगला घरातून बाहेर काढून सर्वांना वाचवण्‍याची जबाबदारी त्‍याच्‍यावर असते. ज्‍यामुळे त्‍याचे सासरे त्‍याच्‍यावर प्रभावित होतील. प्रत्‍येकजण या स्थितीचा सामना करण्‍यासाठी एकत्र येतात, जे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण असणार आहे.'

Web Title: Occupation of King Sakalech's house occupied in 'Mangalam Dangalam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.