100 डेजमध्ये येणार आता हा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:20 IST2016-12-15T16:20:45+5:302016-12-15T16:20:45+5:30
100 डेज ही मालिका केवळ 100 भागांची आहे. कोणतीही मराठी मालिका ठरावीक भागांची असण्याची ही छोट्या पडद्यावरची पहिलीच वेळ ...

100 डेजमध्ये येणार आता हा ट्विस्ट
100 डेज ही मालिका केवळ 100 भागांची आहे. कोणतीही मराठी मालिका ठरावीक भागांची असण्याची ही छोट्या पडद्यावरची पहिलीच वेळ आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेची निर्मिती संतोष अयाचित आणि सुनील भोसले यांची आहे. 100 डेजआधी याच निर्मात्यांच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेमुळे प्रेक्षकांना 100 डेजकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. याविषयी संतोष अयाचित सांगतात, "रात्रीस खेळ चाले आणि 100 डेज या दोन्ही मालिकांमध्ये खूपच फरक आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत गुन्हेगार कोण आहे हे गूढ आम्ही शेवटपर्यंत लोकांच्या समोर आणले नव्हते तर याउलट 100 डेजमध्ये पहिल्याच भागात गुन्हेगार कोण आहे हे लोकांना कळले आहे. केवळ हा गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून सुटतो की पोलिस त्याला पकडतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे आता लवकरच 50 भाग पूर्ण होणार आहेत. आता लवकरच मालिकेत प्रेक्षकांना मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार आहे. मालिकेच्या क्लायमॅक्सच्या खूप जवळ प्रेक्षकांना नेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत."
100 डेज या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील तेजस्विनीचा लूक प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
100 डेज या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील तेजस्विनीचा लूक प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.