आता हा कार्यक्रम घेणार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 10:38 IST2017-11-07T05:08:37+5:302017-11-07T10:38:37+5:30

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मराठी इंडस्ट्रीलीच नव्हे तर बॉलिवूडला देखील भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड ...

Now let's go to the program | आता हा कार्यक्रम घेणार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा

आता हा कार्यक्रम घेणार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा

ा हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मराठी इंडस्ट्रीलीच नव्हे तर बॉलिवूडला देखील भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील या कार्यक्रमाचे फॅन आहेत. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण हा कार्यक्रम एका नव्या ढंगात लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी, अनुष्का शर्मा, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा, अनुष्का शर्मा, कंगना रणौत यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात अनेकवेळा हजेरी लावली आहे. तसेच भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनी देखील या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती केली होती. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. पण आता हा कार्यक्रम काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची घोषणा करण्यात आली नसली तरी हा कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समजतेय. या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची जागा सारेगमप घेणार आहे. सारेगमप या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा हा सिझन देखील खूप चांगला असणार याची प्रेक्षकांना खात्री आहे.
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम ब्रेकवर जाणार असल्याने या कार्यक्रमाचे फॅन्स या कार्यक्रमाला प्रचंड मिस करणार आहेत यात काही शंकाच नाही.  

Also Read : 'चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांना इतके मिळते मानधन!

Web Title: Now let's go to the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.