आता या मालिकेची परदेशवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 17:24 IST2016-11-07T17:24:02+5:302016-11-07T17:24:02+5:30
मालिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. परदेस मैं हे मेरा दिल या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण ऑस्ट्रीयात करण्यात ...

आता या मालिकेची परदेशवारी
म लिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. परदेस मैं हे मेरा दिल या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण ऑस्ट्रीयात करण्यात आले आणि आता ये है मोहोब्बते या मालिकेची टीम परदेशात चित्रीकरणासाठी जात आहे.
यै हे मोहोब्बते गेली कित्येक महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे सगळे चित्रीकरण हे भारतातच होते. पण आता पहिल्यांदाच या मालिकेची टीम चित्रीकरणासाठी परदेशी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड या शहरात या मालिकेचे चित्रीकरण होणार आहे. अॅडलेड हे शहर ऑस्ट्रेलियातील अतिशय सुंदर शहर मानले जाते. या शहरातील अॅडलेड ओव्हल या प्रसिद्ध स्टेडियमच्या आणि रुंडल स्ट्रीट मार्टच्या परिसरात या मालिकेचे चित्रकरण केले जाणार आहे. तसेच तेथील स्थानिक ट्रमबसने या मालिकेची टीम प्रवास करणार आहे. तसेच डॉल्फिन माशांना पाहात बोटीतून प्रवास करताना आणि तेथील मार्केटमध्ये फेरफटका मारताना या मालिकेची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या मालिकेतील इशिता आणि रमण यांचे नुकतेच लग्न झाल्याचे आपण पाहिले. ते लग्नानंतर शगुन, छोटी पिहू, रुही या सगळ्यांसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. ते लवकरच ऑस्ट्रेलियाला जायला निघणार आहेत. याविषयी दिव्यांका सांगते, "ऑस्ट्रेलियात चित्रीकरण करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रीकरणामुळे मला ऑस्ट्रेलियाची संस्कृती खूप जवळून पाहायला मिळणार आहे याचा मला आनंद होत आहे." तर या मालिकेत रुहीची भूमिका साकारणारी आदिती भाटिया सांगते, "माझ्या पहिल्याच मालिकेत मला परदेशात चित्रीकरण करायला मिळत आहे. यामुळे मी खूपच खूश आहे."