​आता हा अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:56 IST2016-10-27T16:56:39+5:302016-10-27T16:56:39+5:30

ये प्यार ना हो कम, दिल से दिया वचन यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकलेला अभिनेता गौरव खन्ना लवकरच लग्नबंधनात ...

Now, the actor will get married | ​आता हा अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

​आता हा अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

प्यार ना हो कम, दिल से दिया वचन यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकलेला अभिनेता गौरव खन्ना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गौरव सध्या तेरे बिन या मालिकेत प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. गौरवचे अभिनेत्री आकांक्षा चमोलासोबत प्रेमप्रकरण असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. आकांक्षा अनेक वेळा तिच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर गौरवसोबतचे फोटो शेअर करते. या फोटोंखाली तिने लिहिलेल्या मजकुरांमधून या दोघांच्या नात्याबद्दल सगळ्यांना कुणकुण लागली होती. पण गौरव किंवा आकांक्षाने या चर्चांबद्दल मौन राखणेच पसंत केले होते. पण ते लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. आकांक्षा चमोला स्वरांगिणी या मालिकेत सध्या प्रमुख भूमिका साकारत आहे. 
गौरव आणि आकांक्षा गेल्या कित्येक महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात असून त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्याच्या 23 तारखेला ते दोघे कानपूरमध्ये साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. गौरव आणि आकांक्षाची भेट एका ऑडिशनच्यावेळी झाली होती. गौरव छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता असल्याचे आकांक्षाला त्यावेळी माहीत नव्हते. त्यामुळे या ऑडिशनच्यावेळी ती त्याला अभिनयाच्या काही टिप्स देत होती. अक्षयनेदेखील काही वेळ सगळे काही ऐकून घेतले आणि आकांक्षाला आपली खरी ओळख सांगितली. त्यानंतर आकांक्षाला काय बोलायचे हेच कळत नव्हते. इथूनच या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

Web Title: Now, the actor will get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.