निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे आल्या 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 05:04 PM2022-03-12T17:04:22+5:302022-03-12T17:04:54+5:30

Indian Idol Marathi:'इंडियन आयडल मराठी'च्या आगामी भागात निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी त्यांच्या आठवणी सांगून, त्यांच्या कामाविषयी बोलून सगळ्यांनाच ९०च्या दशकात नेलं.

Nivedita Saraf and Priya Berde came together on the stage of 'Indian Idol Marathi' | निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे आल्या 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर एकत्र

निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे आल्या 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर एकत्र

googlenewsNext

'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला कुणी ना कुणी सेलिब्रेटी हजेरी लावत असते. मागील आठवड्यात सैराट फेम दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट झुंडचे प्रमोशनदेखील केले. आताच्या आठवड्यात नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) हजेरी लावणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्या दोघी एकत्र दिसणार आहेत. 

 यंदाच्या आठवड्यात अभिनयाच्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज अभिनेत्री मंचावर येणार आहेत. ९० चं दशक गाजवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेतला. 'इंडियन आयडल मराठी'च्या आगामी भागात सुरांच्या मंचावर आठवणींचा पेटारा उघडला जाणार आहे. अभिनेत्री निवेदिता आणि प्रिया यांनी त्यांच्या आठवणी सांगून, त्यांच्या कामाविषयी बोलून सगळ्यांनाच ९०च्या दशकात नेलं. स्पर्धकांनाही स्वतःच्या आवडीची गाणी सादर करण्याची मुभा असल्याने एकंदरीतच येणारा आठवडा प्रेक्षकांसाठी विशेष असेल यात शंका नाही.
या भागात विविध प्रकारची सुरेल गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. पाहायला विसरू नका सोमवार ते बुधवार, रात्री ९ वाजता 'इंडियन आयडल मराठी' फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
 

Web Title: Nivedita Saraf and Priya Berde came together on the stage of 'Indian Idol Marathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.