अनोख्या अंदाजात ‘खूँख्वार- सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ या मालिकेत नीता शेट्टीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 11:36 IST2017-01-05T11:36:04+5:302017-01-05T11:36:04+5:30

नीता शेट्टीच्या या हटक्या फोटोप्रमाणेच तिची भूमिकाही अतिशय वेगळी रेखाटण्यात आली आहे. भूमिकेत असणा-या वेगळेपण यांमुळेच नीता या मालिकेत ...

Nita Shetty's entry in the series 'Khokhar- Supercops vars surveillance' | अनोख्या अंदाजात ‘खूँख्वार- सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ या मालिकेत नीता शेट्टीची एंट्री

अनोख्या अंदाजात ‘खूँख्वार- सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ या मालिकेत नीता शेट्टीची एंट्री

ता शेट्टीच्या या हटक्या फोटोप्रमाणेच तिची भूमिकाही अतिशय वेगळी रेखाटण्यात आली आहे. भूमिकेत असणा-या वेगळेपण यांमुळेच नीता या मालिकेत एंट्री करतेय.या मालिकेत नीता ‘विचुखी’ या अर्धी मानव-अर्धी विंचू असलेल्या विंचूकन्येची भूमिका साकारणार आहे.या मालिकेत नीताला अगदी भिन्न लूक दिला गेला आहे. पहिल्यांदाच टीव्ही मालिकेत अशाप्रकारे ‘विंचूकन्ये’चे चित्रण करण्यात येणार आहे. नेहमी काळजीपूर्वक भूमिका निवडणारी नीता या भूमिकेबाबत सांगते, “मी यापूर्वी अशी भूमिका पडद्यावर कधीच साकारलेली नाही. किंबहुना अर्धी मानव-अर्धी विंचू अशा स्वरूपाची कोणतीही व्यक्तिरेखा यापूर्वी भारतीय टीव्हीवर सादरच झालेली नाही, त्यामुळे ही संधी मिळताच मी ती स्विकारली.”
 
मालिकेतील माझा लूकही खूप वेगळा आहे.क्रिएटिव्ह टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आहे; कारण यापूर्वी अशी भूमिका कोणी साकारलेलीच नसल्याने त्यांनाही कोणताही संदर्भ नव्हता.या भूमिकेत जेव्हा रसिक मला बघतील आणि प्रेक्षकांची कोणती प्रतिक्रिया उमटते हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.व्हॅम्पायर टोळीचा नाश करण्यासाठी बिचुखी (नीता शेट्टी) ही लांडग्यांच्या टोळीला मदत कररताना दिसणार.याव्यतिरिक्त मालिकेत हर्षद अरोरा आणि रागिणी नंदवाणी हे प्रमुख भूमिकेत आहेत.
 
याआधी नीता शेट्टीने 'घर लक्ष्मी बेटीयाँ','कही तो होगा','बनु में तेरी दुल्हन','परिवार','प्यार की ये एक कहानी','ससुराल सिमर का' यासारखे अनेक मालिका आणि बाॅलिवूमडमध्ये 'नो एंट्री' तसेच लवकरच प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा फुगेमध्येही नीताने भूमिका साकारली आहे.त्यामुळे भविष्यात सिनेमा असो किंवा मालिका योग्य आणि मनाला भिडतील अशाच भूमिका निवडणार असल्याचे तिने म्हटेल आहे. कारण  भूमिकाही ही कलाकाराला योग्य ती ओळख मिळवून देते. त्यामुळे योग्य भूमिकेच निवड करणे गरजेचे असते असे नीताचे मत आहे.



 

Web Title: Nita Shetty's entry in the series 'Khokhar- Supercops vars surveillance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.