माझा होशील ना या मालिकेच्या कथानकाला मिळणार वळण, वाचा काय होणार मालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:56 IST2021-01-23T16:54:52+5:302021-01-23T16:56:30+5:30

माझा होशील ना या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

new twist in zee marathis' majha hoshil na | माझा होशील ना या मालिकेच्या कथानकाला मिळणार वळण, वाचा काय होणार मालिकेत

माझा होशील ना या मालिकेच्या कथानकाला मिळणार वळण, वाचा काय होणार मालिकेत

ठळक मुद्देआदित्य आणि सईची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण त्यांच्या प्रेमात मेघनाची ढवळाढवळ प्रेक्षकांना आवडत नाहीये. या मालिकेच्या फॅन्सना मेघनाचा प्रचंड राग यायला लागला आहे.

माझा होशील ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. माझा होशील ना या मालिकेतील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेतील नायक विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.

माझा होशील ना या मालिकेच्या कथानकाला आता एक वळण मिळणार आहे. आदित्य आणि सईची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण त्यांच्या प्रेमात मेघनाची ढवळाढवळ प्रेक्षकांना आवडत नाहीये. या मालिकेच्या फॅन्सना मेघनाचा प्रचंड राग यायला लागला आहे. आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मेघनाचा आदित्यसोबत ठरलेला साखरपुडा मोडणार आहे. आता मेघना खरंच आदित्यचा नाद सोडतेय की ही तिची काही नवीन खेळी आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

माझा होशील ना... या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

Web Title: new twist in zee marathis' majha hoshil na

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.