'तारक मेहता'मध्ये नवीन ट्विस्ट, गोकुळधाम सोसायटीतून पोपटलाल झाला बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 09:00 PM2020-11-02T21:00:47+5:302020-11-02T21:01:09+5:30

गोकुळधाम सोसायटीतील सर्व रहिवासी चिंतेंत आहेत आणि या चिंतेचे कारण पोपटलाल बेपत्ता आहे.

New twist in 'Tarak Mehta', Popatlal disappeared from Gokuldham society | 'तारक मेहता'मध्ये नवीन ट्विस्ट, गोकुळधाम सोसायटीतून पोपटलाल झाला बेपत्ता

'तारक मेहता'मध्ये नवीन ट्विस्ट, गोकुळधाम सोसायटीतून पोपटलाल झाला बेपत्ता

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. पोपटलाल गोकुळधाम सोसायटीमधून बेपत्ता झाला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील सर्व रहिवासी चिंतेंत आहेत आणि या चिंतेचे कारण पोपटलाल आहे. खरेतर आदल्या दिवशी संध्याकाळी सर्वजण ठरवतात की सगळे एकत्र सोढी यांच्यासोबत त्यांच्या कारमधून ऑफिसला जायचे. ठरल्याप्रमाणे पोपटलाल शिवाय सगळे सोसायटीच्या आवारात जमतात.. जमलेले सर्व पोपटलालची वाट पाहतात आणि आवाज देतात. पोपटलालचे काहीच प्रत्युत्तर न आल्यामुळे सर्व चिंतींत होऊन त्याच्या घरी जातात. दरवाजा वाजवूनदेखील आतून उत्तर मिळत नाही. तेव्हा सोढी पोपटलालच्या घराचा दरवाजा तोडायचा विचार करतात. पण भिडे तसे करू देत नाही.


खरेतर सरकारने लॉकडाउनवर मुभा देत लोकांना कामावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे गोकुळधाम वासिय यांना दिलासा मिळाला. विशेष करून जेठालाल खूप खूश झाले कारण ते आता त्यांच्या गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊ शकतात. सोसायटीतील इतर पुरूष मंडळीदेखील या निर्णयामुळे खूश आहेत. अशात आदल्या दिवशी संध्याकाळी शाम अब्दुल यांच्या दुकानावर बातचीत करताना सोढी दुसऱ्या दिवशी सर्वांना ऑफिस आणि दुकानात सोडण्याचा प्रस्ताव ठेवतात. सार्वजनिक वाहने अद्याप हवी तशी उपलब्ध नसल्यामुळे सोढींशी सर्वजण सहमत होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण ठरलेल्या वेळेत सोसायटीच्या कंपाउंडमध्ये पोहचतात तेव्हा पोपटलाल गैरहजर असतो.
पोपटलाल का गायब झाला आहे, कुठे असेल पोपटलाल , जाणून बुजून घराचा दरवाजा उघडत नाहिये का पोपटलाल, या सगळ्याची उत्तरे आगामी भागात मिळेल.

Web Title: New twist in 'Tarak Mehta', Popatlal disappeared from Gokuldham society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.