सारं काही तिच्यासाठी: निशिगंधाला ओळखलं का? यापूर्वी केलंय गाजलेल्या मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 05:54 PM2023-08-27T17:54:21+5:302023-08-27T17:55:04+5:30

dakshata joil: सारे काही तिच्यासाठी या मालिकेत दक्षता जोईल हिने निशिगंधा ही भूमिका साकारत आहेत

new tv serial sare kahi tichasathi fame actress dakshata joil | सारं काही तिच्यासाठी: निशिगंधाला ओळखलं का? यापूर्वी केलंय गाजलेल्या मालिकेत काम

सारं काही तिच्यासाठी: निशिगंधाला ओळखलं का? यापूर्वी केलंय गाजलेल्या मालिकेत काम

googlenewsNext

झी मराठीवर अलिकडेच सारं काही तिच्यासाठी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोन सख्या बहिणींच्या नात्यावर भाष्य करणारी ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत या मुख्य भूमिकेत झळकत आहेत. विशेष म्हणजे या दोन दिग्गज अभिनेत्रीसोबतच आणखीन एक अभिनेत्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दक्षता जोईल.

सारे काही तिच्यासाठी या मालिकेत दक्षता जोईल हिने निशिगंधा ही भूमिका साकारत आहेत. गावाकडे एका धनसंपन्न कुटुंबात वाढलेली निशिगंधा अत्यंत गुणी, संस्कारी पण तितकीच होतकरु आहे. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री झाल्यापासून प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. दक्षताची ही दुसरी मालिका असून यापूर्वी ती सन मराठीवरील एका गाजलेल्या मालिकेत झळकली आहे. 

दक्षताने 'सारे काही तिच्यासाठी' या मालिकेपूर्वी 'आभाळाची माया' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग यापूर्वीच तयार झाला आहे. परंतु, झी मराठीवरील मालिका मिळाल्यामुळे दक्षता प्रचंड खूश असून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"सारे काही तिच्यासाठी या मालिकेत मी निशिगंधाची भूमिका साकारत आहे. निशिगंधा खूप साधी आणि लाजाळू स्वभावाची मुलगी आहे. पण दक्षता वास्तविक जीवनात खूप  चुणचुणीत आणि मस्तीखोर आहे. रघुनाथराव तिचे वडील असून त्यांचा धाक आहे कारण ते खूप परंपरानिष्ठ आहेत. तुम्ही मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की रघुनाथराव अजूनही टेलिफोन वापरतात आणि ते स्वदेशीचे पुरस्कर्ते आहेत, तरीपण त्यांचा विकासाला विरोध नाही. त्यामुळे निशिगंधा मुळातच खूप शिस्तप्रिय आहे, हे तिच्या व्यक्तिरेखेत तुम्हाला दिसेल. व तिला आनंद झाला तरी तिच्या डोळ्यात पाणी येत आणि दुःखी असली तरी डोळ्यात पाणी येत. निशिगंधा खूप हळव्या स्वभावाची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उत्तम बॅडमिंटनपटू आहे'', असं दक्षताने तिच्या भूमिकेविषयी सांगितलं.

पुढे ती म्हणते, "सर्वप्रथम या मालिकेतील स्टार कास्ट खूप कमाल आहे. अशोक शिंदे सर, खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा ताई आणि रुची म्हणजेच ओवी जी माझ्या बहिणीचा रोल करतेय. या सगळ्यांबरोबर काम करायला दडपण वाटत होत पण त्यांच्या सोबत आता काम करताना खूप खूप मज्जा येते. सारं काही तिच्यासाठी मालिकेची सर्व टीम खूप छान आहे. सेटवरच वातावरण सुद्धा खूप सुंदर असते.''

Web Title: new tv serial sare kahi tichasathi fame actress dakshata joil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.