'फुलपाखरू'मधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:02 PM2018-08-10T16:02:44+5:302018-08-10T16:07:39+5:30

लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेले मंगळसूत्र महिलांच्या पसंतीस पडले आहे.

New trend of Vaidehi's Mangalsutra in Phulpakharu Serial | 'फुलपाखरू'मधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र होतेय चर्चा

'फुलपाखरू'मधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र होतेय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रिया कळंबे यांनी केले वैदेहीचे मंगळसूत्र डिझाईन

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेतील वैदेहीचे मंगळसूत्र सध्या चर्चेत आले आहे. प्रेक्षकांनी नुकतेच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेले मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरले. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही. चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहेत. प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीचे तीन पदरी छोटे मंगळसूत्र अनेक महिलांना आवडले आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात. तसेच वैदेहीचे मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे. वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आले आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आला आहे. हे मंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके  आहे. यामुळे हे मंगळसूत्र देखील महिलांना भुरळ पाडेल.

प्रिया कळंबे यांनी सांगितले की,' आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखील सांभाळायचे असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींना खूप कुतुहल वाटते. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्र शोभेल असे असले की त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो आणि याच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आले आहे.'

वैदेहीचे हे मंगळसूत्र महिलांना भुरळ पाडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: New trend of Vaidehi's Mangalsutra in Phulpakharu Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.