लवकरच नवी मालिका 'अबोली' रसिकांच्या भेटीला, गौरी कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:22 PM2021-11-11T15:22:32+5:302021-11-11T15:23:10+5:30

मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

New Marathi Serial Aboli will soon be started, Gauri Kulkarni will be in main role, check details here | लवकरच नवी मालिका 'अबोली' रसिकांच्या भेटीला, गौरी कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

लवकरच नवी मालिका 'अबोली' रसिकांच्या भेटीला, गौरी कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

googlenewsNext

लवकरच छोट्या पडद्यावर नवी मालिका अबोली रसिकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी खुपच उत्सुक आहे.या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. 

खरंतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही. माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरु असते.अबोली मात्र मितभाषी आहे. त्यामुळे अबोली साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. आमची टीम खूपच छान आहे. सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मालिका पहाताना भरभरुन आनंद मिळेल याची खात्री आहे.

या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.या भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, ‘मी खूपच एक्सायटेड आहे.या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

Web Title: New Marathi Serial Aboli will soon be started, Gauri Kulkarni will be in main role, check details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.