प्रार्थनाचा न्यू लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 15:30 IST2016-04-13T22:30:56+5:302016-04-13T15:30:56+5:30
प्रार्थनाचा हा सुंदर न्यू लूक पाहून विचारात पडला असाल की, हिने कोणत्याची नवीन चित्रपटासाठी हा लूक बनविला आहे का? ...
.jpg)
प्रार्थनाचा न्यू लूक
प रार्थनाचा हा सुंदर न्यू लूक पाहून विचारात पडला असाल की, हिने कोणत्याची नवीन चित्रपटासाठी हा लूक बनविला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी लोकमत सीएनएकसने प्रार्थना बेहरेशी संवाद साधला असता ती म्हणाली, स्पेसिफीक कोणत्या चित्रपटासाठी हा हेअरकट केला नाही. तर समर असल्यामुळे मी हा न्यू हेअरकट केला आहे. जवळजवळ मी अकरावी या बारावीत होते त्यावेळी शॉर्ट हेअरकट ठेवला होता. माझी खूप दिवसांची ही इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे. सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे शुटिंग सातत्याने असल्यामुळे इच्छेनुसार हेअर कट करणे अशक्यच होते. तसेच सपोर्स कोणता चित्रपट आला तर आॅलरेडी लांब केस असले की त्यांना तेच केस आवडतात. नंतर मध्येच हेअर कट केला की तो छान दिसेल की नाही अशी रिस्क कोणी घेत नाही. आॅलरेडी लहान केस असेल तर गरजेनुसार प्यॉच लावता ही येईल.पण, या न्यू लूक मध्ये खूप मजा येत आहे. असे वाटते की चार वर्षे मी मागे गेली आहे. त्यामुळे नवीन व वेगळा असा फील येत आहे. असो, प्रार्थनाचा हा सुंदर व हटके न्यू लूक नक्कीच तिच्या चाहत्यांना ही पसंत पडेल हे मात्र नक्की.