करणची नवी झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:09 IST2016-10-27T15:40:39+5:302016-10-27T16:09:18+5:30
करण जोहर सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात अनेकवेळा तो स्पर्धकांसोबत थिरकतानाही आपल्याला ...
.jpg)
करणची नवी झलक
क ण जोहर सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात अनेकवेळा तो स्पर्धकांसोबत थिरकतानाही आपल्याला पाहायला मिळतो. हा कार्यक्रम जानेवारीत संपणार असल्याची चर्चा आहे. पण असे असले तरीही या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणात गेली कित्येक दिवस करण व्यग्र होता. त्यामुळे त्याला कोणत्याही रिअॅलिटी शोला वेळ देता येत नव्हता. आता या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो दुसऱ्या एका रिअॅलिटी शोकडे वळला आहे. त्याच्याकडे असलेला वेळ आता त्याने दिल है हिंदुस्थानी या कार्यक्रमाला देण्याचा ठरवला आहे. या कार्यक्रमात तो पुन्हा एकदा परीक्षकाची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक सिगिंग रिअॅलिटी शो असून चांगला आवाज असलेल्या लोकांना या कार्यक्रमात येण्याची संधी मिळणार आहे. चांगल्यातला चांगला गायक या कार्यक्रमाद्वारे लोकांच्यासमोर आणण्याचा या कार्यक्रमाच्या टीमचा मानस आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या स्टाईलमध्ये गाणाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाणाऱ्या लोकांना पहिली संधी देण्यात येणार आहे. करणसोबतच या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांच्या गाण्याचे परीक्षण गायक बादशहादेखील करणार आहे. बादशहाने सेल्फी ले ले रे, लडकी ब्युटीफूल कर कई, बेबी को बेस पसंत है, काला चष्मा ही आजच्या पिढीची आवडती गाणी गायली आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी या मालिकेच्या निर्मात्यांना खात्री आहे. दिल है हिंदुस्थानी या मालिकेचे ऑडिशन लवकरच मुंबई, दिल्ली, कोलकता तसेच भारतातील महत्त्वाच्या शहरात होणार आहे.