'देवमाणूस २' नंतर नेहा खानची हिंदी टेलिव्हिजनवर एन्ट्री, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:26 PM2024-04-19T16:26:45+5:302024-04-19T16:27:06+5:30

Nehha Khan : नेहा खान शेवटची देवमाणूस २ मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ती हिंदी मालिकेत काम करताना दिसते आहे.

Neha Khan's entry on Hindi television after 'Devmanoos 2', will be seen in this series | 'देवमाणूस २' नंतर नेहा खानची हिंदी टेलिव्हिजनवर एन्ट्री, दिसणार या मालिकेत

'देवमाणूस २' नंतर नेहा खानची हिंदी टेलिव्हिजनवर एन्ट्री, दिसणार या मालिकेत

'शिकारी' (Shikari) चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. ती एका हिंदी मालिकेत काम करते आहे. या मालिकेचे नाव आहे तेरी मेरी डोरियां. 

नेहा खान हिने इंस्टाग्रामवर मालिकेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ती मालिकेत काम करत असल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये लिहिले की,सर्वांनी ऐका. मी सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे की, मी तेरी मेरी डोरियां मालिकेत काम करते आहे. माझी कालच या मालिकेत एंट्री झाली. उशीरा कळवत असल्यामुळे माफी मागते. स्टार प्लस वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता मी भेटेन. तुमचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी जग आहे. मी तुमची आभारी आहे.

नेहा खान शेवटची देवमाणूस २ मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ती हिंदी मालिकेत काम करताना दिसते आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला हिंदी मालिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

वर्कफ्रंट...

नेहा खानने मराठी कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केले आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. शिकारी चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. याव्यतिरिक्त ती झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिने नृत्याची झलक दाखवली होती. तसेच ती देवमाणूस २ मालिकेतही पाहायला मिळाली.

Web Title: Neha Khan's entry on Hindi television after 'Devmanoos 2', will be seen in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.