दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:13 IST2025-10-20T13:13:15+5:302025-10-20T13:13:45+5:30
अभिनेत्रीच्या मुलाचं नाव माहितीये का?

दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
मराठी अभिनेत्री नेहा गद्रे 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून घराघरात पोहोचली होती. २००९ साली ही मालिका आली होती. नेहाने नंतर काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं. करिअर चांगलं सुरु असताना अचानक तिने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. काही महिन्यांपूर्वीच नेहाने गोंडस मुलाला जन्म दिला. तर काही दिवसांपूर्वी तिने लेकाचा चेहरा सोशल मीडियावर सर्वांना दाखवला. आता तिने चिमुकल्याचा गोड फोटो पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नेहा गद्रेने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'इवान' असं ठेवण्यात आलं. इवान ८ महिन्यांचा झाला असून नेहाने पहिल्यांदाच त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला. इवान अगदी त्याच्या वडिलांवर गेल्याचं दिसत आहे तर त्याची स्माईल नेहासारखी आहे. छोट्या इवानवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. इवानची ही पहिली दिवाळी असल्याने नेहाने पोस्ट शेअर केली आहे. इवानला कडेवर घेऊन तिने गोड फोटो पोस्ट केला आहे. यात तिने गुलाबी साडी नेसली आहे तर इवानलाही क्युट ड्रेस घातला आहे. ती कॅप्शनमध्ये लिहिते, "माझ्या छोट्या स्टारची पहिली दिवाळी. पणत्यांच्या दिव्याप्रमाणेच तूही असाच चमकत राहो आणि तुझं आयुष्य आनंदाने भरलेलं राहो. आमच्याकडून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा."
'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा अजूनही चांदरात आहे मालिकेत दिसली होती. मोकळा श्वास, गडबड झाली या सिनेमांतही तिने काम केलं होतं. २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. परदेशात स्थायिक झाली असली आणि सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते.