नेहा अर्जुनचे ब्रेकअप नाही पॅचअप होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 16:32 IST2016-11-08T16:32:14+5:302016-11-08T16:32:14+5:30
'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत देवची बहीण नेहा पती रणवीरला घटस्फोट देण्यासाठी नोटीस पाठवते. देवची आई ईश्वरी ...

नेहा अर्जुनचे ब्रेकअप नाही पॅचअप होणार
' ;कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत देवची बहीण नेहा पती रणवीरला घटस्फोट देण्यासाठी नोटीस पाठवते. देवची आई ईश्वरी आणि देव तिच्या बहिणीला सुखाने तिच्या पतीसह संसार करण्याची समजुत घालतात मात्र तरीही नेहा कोणत्याही गोष्टी समजून घेण्याच्या तयारीत नसून पतीला घटस्फोट देण्याच्या निर्णयावर ती ठाम असते. नेहाचे वागणे चुकीचे आहे तिला समजण्यासाठी सध्या देव आणि सोनाक्षी दोघांनी एक प्लॅन आखला आहे. त्यानुसार सोनाक्षी भाऊबीज साजरी करण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या घरी जाते. काही दिवस तिथेच राहण्याचा निर्णय घेते. देवला सोनाक्षीपासून इतके दिवस लांब राहणे काही शक्य होत नाही. त्यामुळे तो सोनाक्षीला परत आणण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या घरी जातो. मात्र सोनाक्षी देवबरोबर सासरी परतण्यासाठी नकार देते. काही दिवस आई वडिलांबरोबरच राहणार असल्याचे देवला सोनाक्षीकडून कळताच तोही सोनाक्षी बरोबर तिच्या घरी राहतो. मात्र दुसरीकडे नेहाला देव आणि सोनाक्षीचे प्रेम बघून आपण आपल्या पतीला सोडून आईच्या घरी राहतो जे चुकीचे आहे अशी जाणीव होते. नेहाचेही रणवीरवर खूप प्रेम असते त्यामुळे ती पुन्हा रणवीर बरोबर आहे त्या परिस्थिती सुखाने संसार करताना मालिकेत दिसणार आहे.