​गुलाम या मालिकेतून नीती टेलरला मिळणार डच्चू?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 11:09 AM2017-07-26T11:09:42+5:302017-07-26T16:39:42+5:30

गुलाम या मालिकेत नीती टेलर प्रमुख भूमिका साकारत असून या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंत मिळत आहे. पण ...

Neetu Taylor to get away from the series of slaves? | ​गुलाम या मालिकेतून नीती टेलरला मिळणार डच्चू?

​गुलाम या मालिकेतून नीती टेलरला मिळणार डच्चू?

googlenewsNext
लाम या मालिकेत नीती टेलर प्रमुख भूमिका साकारत असून या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंत मिळत आहे. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेच्या कथानकाला एक वळण मिळणार असून त्यामुळे निती टेलर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
नीती गुलाम या मालिकेत शिवानीची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच भरभरून प्रतिसाद दिला आहे. पण आता मालिकेत शिवानीचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गुलाम या मालिकेत नीती शिवानी या भूमिकेला योग्य न्याय देत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. त्यामुळे तिच्याशिवाय या मालिकेचा प्रेक्षक विचारदेखील करू शकत नाही. पण या मालिकेच्या कथानकात अनेक बदल होणार असल्याचे कळतेय. मालिकेत आता एक नवीन व्यक्तिरेखा दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे.
गुलाम मालिकेच्या पुढील काहीच भागात नीतीचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध चेहरा या मालिकेचा भाग बनणार आहे. सध्या पूजा गौर, पूजा बॅनर्जी, एकता कौल यांसारख्या अभिनेत्रींचा या भूमिकेसाठी विचार करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
निती टेलरने प्यार का बंधन या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती गुलाल, बडे अच्छे लगते है, ये है आशिकी यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. तिने मालिकांसोबत चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली असून तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश देखील मिळालेले आहे. 

Also Read : फिट राहण्यासाठी 'गुलाम' मालिकेतील नीती टेलर शिकली झुंबा

Web Title: Neetu Taylor to get away from the series of slaves?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.