मोनालिसाने या शोसाठी वॉल-क्लाईंबिंगचे घेतले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:50 AM2018-08-03T10:50:02+5:302018-08-03T10:51:36+5:30

मोनिलासानेही ही भूमिका परफेक्ट दिसावी यासाठी वॉल क्लाईंबिंगचेही धडे घेतले.तिच्या लूकवरही तितकीच मेहनत घेण्यात आली आहे.

Nazar:  Monalis learned lessons from Wall-Climbing for this show | मोनालिसाने या शोसाठी वॉल-क्लाईंबिंगचे घेतले धडे

मोनालिसाने या शोसाठी वॉल-क्लाईंबिंगचे घेतले धडे

googlenewsNext

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने अनेक भोजपुरी सिनेमात काम केले आहे.तिला खरी लोकप्रियता मिळाली बिग बॉसच्या 10 व्या सिजनमध्ये. शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते.अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते. या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.विक्रांतही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करतो.रिअॅलिटी शोनंतर आता मोनालिसा डेली सोपकडे वळली आहे.

'नजर'  ह्या मालिकेत डायन मोहनाची भूमिका करत आहे.या मालिकेतील तिचा लूकही खूप भयानक आहे. दरवेळी  कलाकारांना त्यांच्या भूमिकेसाठी खूप मेहनत करावी लागते. मग ते फिटनेस बद्दल असो किंवा लूक वर. अनेक कलाकार आपल्या त्या त्या भूमिकेसाठी कसून मेहनत करत असतो.त्यानुसार मोनिलासानेही ही भूमिका परफेक्ट दिसावी यासाठी वॉल क्लाईंबिंगचेही धडे घेतले.तिच्या लूकवरही तितकीच मेहनत घेण्यात आली आहे.

याविषयी मोनालिसा म्हणाली, “कथानकाचा भाग म्हणून माझी व्यक्तिरेखा मोहना झाडांवर चढते आणि भिंतींवर अगदी सहजपणे चालते.माझ्या व्यक्तिरेखेच्या ह्या वैशिष्ट्‌यांमुळे मी ह्या भूमिकेच्या प्रेमातच पडले त्यामुळे मला माझे काम अगदी अचूक व्हायला हवे आहे.शोमध्ये मी प्रथमच स्टंट परफॉर्म करणार असल्यामुळे मी वॉल क्लाईंबिंगचे धडे घेतले. ते नक्कीच आव्हानात्मक होतं पण मला खूप मजा आली.” जेव्हा हे सगळे स्टंट करताना जेव्हा मला रसिक पाहतील तेव्हा तेही थक्क होतील असा विश्वास मोनालिसाने व्यक्त केली आहे.नेहमी ग्लॅमरस भूमिकेत रसिकांना घायाळ करणारी मोनालिसा या मालिकेत रसिकांना धडकी भरवणार हे मात्र नक्की.

या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. यात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असून ते या डायनची शक्ती किती ताकदवान आहे, ते उघड करतील. याविषयी मोनालिसा सांगते की, “या मालिकेत एका डायनची भूमिकेत मी रसिकासमोर येणार आहे.त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.मालिकेतील प्रसंग हे कोणत्या तरी दुर्गम ठिकाणी घडत नसून ते माणसानी गजबजलेल्या शहरी वस्त्यांमध्ये आणि आजच्या काळात घडतात.यातील मोहनाचे सैंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे ही भूमिका स्विकारली.मुळात तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे पुरुष घायाळ होतात आणि दुसर-यांना संमोहित करण्याच्या शक्तीमुळे ती इतरांकडून तिला हवी ती कामं करवून घेते. 
 

 

 

 

Web Title: Nazar:  Monalis learned lessons from Wall-Climbing for this show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.