​'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेत नासीर खान दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:35 IST2017-11-21T07:05:21+5:302017-11-21T12:35:21+5:30

नासिर खानने आशिर्वाद या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या ...

Naseer Khan will appear in the main role of 'Mere Harmful Biwi' | ​'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेत नासीर खान दिसणार मुख्य भूमिकेत

​'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेत नासीर खान दिसणार मुख्य भूमिकेत

सिर खानने आशिर्वाद या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. &TV वर प्रेक्षकांना 'मेरी हानिकारक बीवी' ही एक उपहासात्‍मक मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या आगळ्या वेगळ्या पटकथेमुळे या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ही मालिका प्रेक्षकांसमोर अगदी हलक्‍या पद्धतीने नसबंदीची समस्‍या मांडणार आहे. या मालिकेमध्‍ये करण सुचक अखिलेशच्या भूमिकेत तर जिया शंकर ईराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हे दोघेही या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत यांच्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहे. अनेक मालिकांमध्ये झळकलेला नासिर खान सुद्धा या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता मेरी हानिकारक बीवी या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.
ब्रिजेश चित्रपटसृष्‍टीमध्‍ये नाव कमावण्‍याचे स्‍वप्‍न बाळगून वाराणसीमधून मुंबईमध्‍ये येतो. स्‍वभावाने कणखर आणि उत्‍तम जाणकार असलेल्‍या ब्रिजेशला महिलांचे मन कसे जिंकावे, हे चांगलेच माहीत आहे. तो कोणत्‍याही परिस्थितीमध्‍ये स्‍वत: निरागस असल्‍याचे सगळ्यांना दाखवतो. ही भूमिका खूप चांगली असल्याने नासिरने या मालिकेत काम करायचे ठरवले. या भूमिकेविषयी नासिर सांगतो, ''मेरी हानिकारक बीवी या मालिकेची संकल्‍पना अत्‍यंत सर्जनशील आणि प्रभावी आहे. ही संकल्‍पना काळाची गरज आहे. काळानुरूप प्रेक्षकांच्‍या मन:स्थितीमध्‍ये बदल होईल आणि ते या मालिकेमधील मुख्‍य विषयाचा स्‍वीकार करतील. ब्रिजेश पांडेची भूमिका स्‍वीकारण्‍यामागील माझे एकमेव कारण म्‍हणजे या भूमिकेमध्‍ये अनेक सुंदर व्‍यक्तिमत्‍व सामावलेले आहे. या भूमिकेसाठी मी सध्या बरीच तयारी करतोय. पुरुष आणि महिला अशा दोन्‍ही प्रेक्षकांना ब्रिजेश पांडेची भूमिका आपलीशी वाटेल. कारण आपणा सर्वांमध्‍ये काही प्रमाणात त्‍याच्‍यासारखेच गुण आहेत. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.''

Also Read : ​नासिर खान आता झळकणार ये वादा रहा या मालिकेत

Web Title: Naseer Khan will appear in the main role of 'Mere Harmful Biwi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.