नच बलिये या कार्यक्रमातील हा स्पर्धक देतोय मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 11:56 IST2018-04-30T05:56:40+5:302018-04-30T11:56:01+5:30
विनोद ठाकूरला नच बलिये या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्सचे कौतुक झाले होते. विनोद ...

नच बलिये या कार्यक्रमातील हा स्पर्धक देतोय मृत्यूशी झुंज
>विनोद ठाकूरला नच बलिये या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्सचे कौतुक झाले होते. विनोद दिव्यांग असला तरी त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर नृत्यकलेत प्रावीण्य मिळवले होते. नच बलिये ६ या सिझनमध्ये त्याने त्याची जोडीदार रक्षा ठाकूरसोबत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याच्या नृत्याचे बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील फॅन आहेत. इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमातदेखील प्रेक्षकांना विनोदला पाहायला मिळाले होते. पण विनोद सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. विनोदला कार्डियक अरेस्ट आला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
विनोद ठाकूरने १५०० किमी इतका प्रवास त्याच्या व्हील चेअरवरून करण्याचे ठरवले होते. व्हील चेअरवरून इतका प्रवास करण्याचा रेकॉर्ड रचण्याची त्याची इच्छा होती. इंडिया गेट ते गेट वे ऑफ इंडिया या दरम्यान तो प्रवास करणार होता. केवळ ४० दिवसांत हा प्रवास करण्याचे त्याने ठरवले होते. विनोद गेल्या कित्येक दिवसापासून प्रवास करत आहे. ३० एप्रिलला तो इतका मोठा प्रवास करून मुंबईत दाखल झाला. पण मुंबईत आल्यानंतर रस्त्यातच तो चक्कर येऊन पडला. त्याला सध्या मालाडमधील रक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विनोदची तब्येत नाजूक असून तो आयसीयूमध्ये आहे. विनोदला ड्रिहायड्रेशनचा त्रास होत असून त्याचा रक्तदाब देखील कमी आहे.
विनोदच्या प्रकृतीबाबत मीडियाशी बोलताना रक्षा रुग्णालयाचे डॉक्टर प्रणव काबरा यांनी सांगितले आहे की, ठाकूर यांचा रक्तदाब खूप कमी झाल्याने त्यांना कार्डियक अरेस्ट आला आहे.
विनोदला इंडिया गेट ते गेट वे ऑफ इंडिया हा १५०० किमाचा प्रवास त्याच्या व्हीलचेअर वरून करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतली होती. पण १५०० किमीच्या अगदी जवळ असतानाच त्याची तब्येत खराब झाली आणि त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विनोद आणि रक्षा ठाकूर यांचे लग्न काही वर्षांपूर्वी झाले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत.
![nach baliye 6 vinod thakur]()
Also Read : अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!
Also Read : अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!