बॉलिवूडची ही अभिनेत्री एवढी संतापली की, सेटवर माईक फेकून निघून गेली, मग घडले असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 13:55 IST2019-09-14T13:51:05+5:302019-09-14T13:55:57+5:30
'नच बलिए 9' हा रिअॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रोज एक नवा ड्रामा नचच्या सेटवर झाल्याची माहिती समोर येते.

बॉलिवूडची ही अभिनेत्री एवढी संतापली की, सेटवर माईक फेकून निघून गेली, मग घडले असे काही
'नच बलिए 9' हा रिअॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रोज एक नवा ड्रामा नचच्या सेटवर झाल्याची माहिती समोर येते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार शोची जज रवीना टंडन शोचा होस्ट मनीष पॉलवर नाराज झाली होती.
लेटेस्ट एपिसोडच्या शूटिंग दरम्यान मनीष पॉल आणि रवीना टंडनमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण एवढे वाढले की रवीना चक्क माईक फेकून बाहेर व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसली. या प्रकरणानंतर काही तासांसाठी शूटिंग थांबवण्यात आले होते.
रिपोर्टनुसार, रवीनाने कानात एअरफोन घातलेला होता आणि यातून तिला कंट्रोल रुममधून सूचना मिळत होत्या. तिला विचारण्यात आले की श्रद्धा आर्य आणि आलमला तिला कोणता प्रश्न विचारायचा आहे. त्यावेळी तिने पाहिलं की मनीष पॉल काही तरी विचित्र हरकती करतो आहे. हे पाहून रवीना मनीषवर चिढली. कॅमेरा बंद होताच मनीषवर बरसली. प्रकरण इतकं टोकाला गेले की मनीष म्हणाला, मी माझं काम करतो आहे. मनीषचं हे उत्तर ऐकून संतापून रवीना माईक फेकून निघून गेली. प्रोडक्शन हाऊसच्या लोकांनी दोघांची समजूत काढली यासाठी जवळपास एक तासाचा वेळ गेला. याआधी रवीना मनीषवर नाराज झाली होती.