Nach Baliye 8: च्या टीमसह दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दाहियासह क्लिक एक सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 16:06 IST2017-03-27T10:36:03+5:302017-03-27T16:06:03+5:30

विवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकर कपल आपापल्या बलियेसह ठेका धरताना दिसणार आहेत. सध्या नच बलिये 8 व्या ...

Nach Baliye 8: Divya Takipathi with her team, with her husband Vivek Dahiya, click one selfie | Nach Baliye 8: च्या टीमसह दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दाहियासह क्लिक एक सेल्फी

Nach Baliye 8: च्या टीमसह दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दाहियासह क्लिक एक सेल्फी

वेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकर कपल आपापल्या बलियेसह ठेका धरताना दिसणार आहेत. सध्या नच बलिये 8 व्या सिझनची शूटिंग सुरू आहे. शूटिंग दरम्यान डान्सची रिहर्सल केल्यानंतर सगळे कपल एकत्र बसले असताना दिव्यांकाने एक स्विट सेल्फी क्लिक केला आहे. हा सेल्फी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअरही केला आहे. यांत तिने म्हटले आहे की,''नच बलिये 8 व्या सिझनची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहात,तुमचे आवडते कलाकार नच बलियेचे विजेतेपद पटकवण्यासाठी खूप तयारी करत आहेत. हा फोटो त्याचाच एक पुरावा आहे.टीम नच रॉक्स''.यंदाच्या 8व्या सिझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्यासह  अभिनेता सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्ती जाधव अभिनेत्री सनाया ईरानी आणि पति मोहित सेहगल,कॉमेडियन भारती सिंह बॉयफ्रेंड हर्ष,अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम,आश्का गोरड़िया आणि बॉयफ्रेंड ब्रेंट गोबल.हे सगळे 'नच बलिये'चा 8वा सिझन आपल्या डान्सने गाजवणार आहेत.

या टीव्ही जोड्यांमध्ये आणखी एक जोडीचाही समावेश आहे. बिग बॉसच्या 10व्या सिझन स्पर्धक मोनालिसा तिचा पती विक्रांत सिंह राजपूतसह थिरकणार आहे.मात्र दिव्यांकाने घेतलेल्या या सेल्फीत हे दोघे दिसत नसल्यामुळे  रसिकांना ही जोडी या शोमध्ये सहभागी होणार आहेत  की नाही याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.मोनालिसा आणि विक्रांतने त्यांच्या डान्सच्या रिहर्सल करतानाचा एक व्हिडीओही त्यांच्या इन्साग्रामवर शेअर केला होता. त्यावेळी या दोघांच्या व्हिडीओला खूप लाईक्स आणि कमेंटस देत रसिकांना दोघांना शुभेच्छाही दिल्या होत्या. नेमकी कोणतीह जोडी थिरकणार किंवा काढता पाय घेणार हे हा शो छोट्या पडद्यावर एंट्री घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nach Baliye 8: Divya Takipathi with her team, with her husband Vivek Dahiya, click one selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.