मी बॉस्कोच्या तालावर नाचलो नाही हे माझे दुर्भाग्य - मिथुन चक्रबोर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 09:30 IST2017-12-26T04:00:34+5:302017-12-26T09:30:34+5:30
झी टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स ६ मध्ये दर आठवड्याला स्पर्धकांना देण्यात आलेल्या आव्हानांमधून नृत्यातील नैपुण्याचे ...
मी बॉस्कोच्या तालावर नाचलो नाही हे माझे दुर्भाग्य - मिथुन चक्रबोर्ती
झ टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स ६ मध्ये दर आठवड्याला स्पर्धकांना देण्यात आलेल्या आव्हानांमधून नृत्यातील नैपुण्याचे अचूक प्रदर्शन पाहायला मिळते. ह्या शो च्या आगामी भागांमध्ये बॉस्कोसीझर जोडीतील कोरियोग्राफर बॉस्को मार्टिस अव्वल कोरियोग्राफर्स सरोज खान, अहमद खान, लाँजिनस फर्नांडिस आणि मिआ मायकेल्सनंतर आता स्पर्धकांना आव्हान देण्याचा विडा उचलणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ह्या कोरियोग्राफरने ह्या स्पर्धकांचे आपल्या अॅक्ट्ससाठी ते घेत असलेली जोखिम, स्वतःच्या परफॉर्मन्सहून अव्वल परफॉर्मन्स करणे आणि आपल्या आधीच्या परफॉर्मन्सचा दर्जा उंचावणे तसेच अॅक्टच्या दरम्यान आपल्या जोडीदारांसोबत त्यांची असलेली केमिस्ट्री ह्या निकषांवर परीक्षण केले. स्पर्धकांच्या अॅक्ट्ससह अतिशय प्रभावित झालेल्या बॉस्कोने सर्वांना मोठा थंब्स अप केला आणि आपल्या परफॉर्मन्समध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. स्पर्धक आणि मास्टर्ससोबत बातचीत करताना बॉस्कोने एका महत्त्वपूर्ण गोष्टीची कबुली दिली. तो म्हणाला की त्याचा सगळ्यात आवडता चित्रपट मिथुन दा यांचा कसम पैदा करने वाले की हा असून त्याने हा चित्रपट जवळजवळ २१ वेळा पाहिला आहे.
तो म्हणाला, “दादा, मी हा चित्रपट पाहिला असल्यामुळे तुम्हांला भेटणे आणि तुमच्यासोबत डान्स करणे हे माझे स्वप्न होते. मला वाटतं की हे माझे दुर्भाग्य आहे की मला तुमच्यासाठी डान्स कोरियोग्राफ करण्याची संधी अजूनपर्यंत मिळालेली नाहीये.”
बॉस्कोमुळे तेवढेच प्रभावित झालेले मिथुन दा म्हणाले, “बॉस्को ते तुझे नाही माझे दुर्भाग्य आहे की आपण अजून एकत्र काम करू शकलेलो नाही. तू एक उत्तम कोरियोग्राफर आहेस आणि बॉलिवूडला काही उत्तमोत्तम डान्स स्टेप्स तू मिळवून दिल्या आहेस. मला तुझ्या हूक स्टेपवर कधीतरी परफॉर्म करायला आणि तुझ्या कोरियोग्राफीवर मोठ्या स्क्रीनवर नाचायला आवडेल”
मिथुनदांच्या ह्या प्रशंसेमुळे भारावून गेलेल्या बॉस्कोने मग मिथुनदांना त्याच्यासोबत कसम पैदा करने वाले की ह्या चित्रपटाच्या शीर्षकावर नाचण्याची विनंती केली. दादांनी त्याची ही विनंती मानली आणि डान्स इंडिया डान्स ६ च्या मंचावर बॉस्कोची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली.
ALSO READ : रिंकू राजगुरूचे हे स्वप्न झाले पूर्ण