मेरे पापा हिरो हिरालालसाठी सरवर आहुजा घेत आहे विशेष प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 15:48 IST2018-02-10T10:18:54+5:302018-02-10T15:48:54+5:30
डिस्कव्हरी जीत ही वाहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वाहिनीवर प्रेक्षकांना मेरे पापा हिरो हिरालाल ही मालिका पाहायला ...

मेरे पापा हिरो हिरालालसाठी सरवर आहुजा घेत आहे विशेष प्रशिक्षण
ड स्कव्हरी जीत ही वाहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वाहिनीवर प्रेक्षकांना मेरे पापा हिरो हिरालाल ही मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेता सरवर आहुजा मुख्य भूमिकेत दिसणार असून तो या मालिकेत रिक्षा चालकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या आधी त्याने अशाप्रकारची व्यक्तिरेखा कधीच साकारली नसल्याने या मालिकेत काम करण्यास तो खूप उत्सुक आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खरीखुरी वाटावी यासाठी हा अभिनेता दोन स्थानिक रिक्षा चालकांकडून खास प्रशिक्षण घेत आहे. सरवर या दोघांचे वागण्या-बोलण्याचे निरीक्षण करण्यासाठी या दोघांसोबत भरपूर वेळ घालवत आहे. त्यांची बोलण्याची टिपीकल पद्धत शिकण्यासाठी तो या दोघांकडून क्लासेस घेत आहे.
हिरालाल तिवारी या रिक्षा चालकाची भूमिका सरवर साकारणार आहे. या भूमिकेविषयी सरवर सांगतो, “मेरे पापा हीरो हिरालाल या मालिकेचा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे. या शो चे कथानक खूपच चांगले असल्याने या मालिकेत काम करण्यास मी होकार दिला. राष्ट्रीय टेलिव्हिजन वाहिनीवर एका रिक्षा चालकाची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही भूमिका अतिशय आव्हानात्मक असून माझ्या या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्यासाठी मी दोन खऱ्याखुऱ्या रिक्षा चालकांसोबत वेळ घालवत आहे. त्यांचे हावभाव, देहबोली, बोलण्याची पद्धत शिकण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भाषेवरही मी मेहनत घेत असून हे चालक त्यांच्या रोजच्या आयुष्यात वापरत असलेल्या शब्दांची नोंद घेत आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक हा शो आणि त्यातील व्यक्तिरेखांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतील.”
विनियार्ड फिल्म्स निर्मित मेरे पापा हिरो हिरालाल ही लखनौमधील रिक्षा चालक हिरालाल तिवारीची भावस्पर्शी कथा आहे. त्याची मुलगी गुनगुनवर त्याचे अतिशय प्रेम आहे आणि तिला एका गंभीर आजारातून बरे करण्यासाठी तो काहीही करण्यासाठी तयार आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीला सुरू होणार आहे.
Also Read : 'मेरे पापा हीरो हिरालाल' मध्ये सरवर आहुजा साकारणार नायकाची भूमिका