Must See: या कलाकरांनी 'अंडरवॉटर' केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 13:21 IST2017-06-02T07:51:41+5:302017-06-02T13:21:41+5:30
कलाकरांच्या साखरपुडा लग्नाच्या बातम्या आपण आजवर ऐकत आलो आहे.मुळात काही कलाकरांनी खास थीमनुसार हे आनंदाचे क्षण खास बनवले.मात्र तुम्ही ...

Must See: या कलाकरांनी 'अंडरवॉटर' केला साखरपुडा
क ाकरांच्या साखरपुडा लग्नाच्या बातम्या आपण आजवर ऐकत आलो आहे.मुळात काही कलाकरांनी खास थीमनुसार हे आनंदाचे क्षण खास बनवले.मात्र तुम्ही कधी अंडरवॉटर पार परडलेला साखरपुडा पाहिला आहे का, नाही ना? तर नेहमी नवनवीन गोष्टी करण्यात प्रसिध्द असलेल्या या लव्हबर्डनेही हटक्या पध्दतीत आपला साखरपुडा केला आहे. आता हे कलाकार कोण हेही जाणून घेण्याची नक्कीच तुम्हाला उत्सुकता लागली असणार. तर ही जोडी आहे ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेले स्मृती खन्ना आणि गौरव गुप्ता. या दोघांनी अंडरवॉटर साखरपुडा करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. याच मालिकेमुळे दोघांची भेट झाली,सेटवर दोघांची मैत्री झाली आणि या गोड मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी रूपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही. ब-याच दिवसांपासून त्यांचे अफेअर सुरू होते.गंमत म्हणजे त्यांच्या सहकलाकरांनाही याविषयी माहिती नव्हते. मात्यार काही कलाकारांना त्यांच्या वागण्या बोलण्यावरून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु वाटायचे. पण, त्यांच्यातील प्रेमप्रकरण त्यांनी कोणालाच कळु दिले नाही.जवळपास महिन्याभरापूर्वीच गौतमने त्यांच्या रिलेशनशीपबद्दल सर्वांना सांगितले आणि गोव्यात व्हॅकेशनसाठी हे दोघे गेले असतानाच तिथे या लव्हबर्डने अंडवॉरट साखरपुडा केला.दोघांनाही हटके स्टाइलने त्यांचे नाते जगासमोर आणायचे होते.त्यानुसार गौरवने स्मृतीला सरप्राईज देण्याचे ठरवले.खास प्लॅनिंग करत हे सरप्राईज गौरवने स्मृतीला दिले.स्मृतीनेही इतके छान सरप्राईज मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यांच्या साखरपुड्याचा एक व्हीडीओही पोस्ट करण्यात आला आहे. दोघांचा हटके साखरपुडा पाहून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.