प्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत ...
मानिनी स्वप्निलचा फेवरेट सिनेमा
/> प्रत्येक कलाकारासाठी आपला सिनेमा हा जवळचाच असतो. कोणत्याही चित्रपटासाठी स्टार्स हे अपार मेहनत घेतात आणि त्यांचे काम पडद्यावर दिसुन येते. परंतू एखादा तरी चित्रपट या कलाकारांच्या जवळचा असतो किंवा फेवरेट असतोच. दर्जेदार चित्रपटांमधुन अभिनयाची चुणुक देखविलेला अभिनेता स्वप्निल जोशी म्हणतोय त्याला त्याचा मानिनी हा चित्रपट फार आवडतो. नवरा बायकोच्या नात्यातील बंध उलगडणारा हा चित्रपट स्वप्निलच्या जवळचा आहे असे तो सांगतोय. एवढेच नाही तर गुलाम ए मुस्तफा हा हिंदी सिनेमा देखील त्याला आवडतो. नाना पाटेकर, शिवाजी साटम यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्वप्निलने या सिनेमात काम केले होते. आपल्या कारकिर्दीतील हे दोन सिनेमे स्वप्निल कधीच विसरणार नाही आणि त्याचे चाहते देखील पुन्हा पुन्हा हे सिनेमे पाहुन स्वप्निलचे वर्क नक्कीच एप्रिशिएट करतील यात शंका नाही.