मी आणि मुंबई पुणे मुंबई :स्वप्नील जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:39 IST2016-01-16T01:14:37+5:302016-02-06T09:39:09+5:30
मी आणि मुक्ता या आधी कधीच पेअर म्हणून एकत्र आलो नव्हतो. दोन माणसे असलेला सिनेमा मी कधीच केला नव्हता. ...

मी आणि मुंबई पुणे मुंबई :स्वप्नील जोशी
ी आणि मुक्ता या आधी कधीच पेअर म्हणून एकत्र आलो नव्हतो. दोन माणसे असलेला सिनेमा मी कधीच केला नव्हता. लव्ह स्टोरीचे वारे नव्हते. मीराह सारखा एक नवीन प्रोड्युसर हा पिर प्रोड्यूस करणार होता.
सतीश, मी आणि मुक्ता पहिल्यांदा काम करणार होतो आणि इतक्या सगळ्या अनपेक्षित कॉम्बिनेशन्सना घेऊन आम्ही मुंबई - पुणे - मुंबई वन ची सुरुवात केली. मला असे वाटते की तो सिनेमा फक्त बनलाच नाही पण माझ्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरु झाला. सतीश आणि मुक्ता सारखे अत्यंत सुंदर आणि जीवलग मित्र आयुष्यभरासाठी मिळाले. गौतमसारखा एक रोल मला निभावता आला. गौरीसारख्या एका कॅरेक्टरची साथ मला मिळाली आणि गौतम -गौरीची जोडी मराठी माणसाने अगदी डोक्यावर घेतली. मुंबई - पुणे - मुंबई मधला गौतम हा स्वप्नील जोशी, म्हणजे माझ्यासारखाच आहे. गौतम मला खूप आपला वाटतो, त्याचे वागणे, बोलणे, त्याचे घरच्यांवरचे प्रेम, त्याचा अभिमान, मराठी संस्कृती, पुणेरी संस्कृतीबद्दल त्याला असलेली ओढ सगळेच फार माझे आहे आणि त्यामुळे गौतम करायला खूप मजा आली.
मुंबई- पुणे- मुंबई ने आम्हाला प्रेम तर दिलेच, अभिनेता म्हणून ओळख, मान, सन्मान तर दिलाच, पण त्याहूनही अधिक प्रत्येक मराठी रसिकाच्या मनात कायमस्वरुपी स्थान दिले आणि त्याच्यासाठी मी मुंबई- पुणे - मुंबई चे आभार मानीन तितके कमी च आहे. आता 'मुंबई पुणे मुंबई- २, लग्नाला यायचंच' येतोय, मला वाटते की मुंबई - पुणे - मुंबई १ चे लॉजिक आणि मजा जास्त द्विगुणित करणारा हा सिनेमा आहे. तर मग येत्या १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या शुभमुहुर्तावरील महाराष्ट्रातील या लाडक्या लग्नाला.