'मुलगी झाली हो'मधील माऊचा खऱ्या आयुष्यात हा अभिनेता आहे बॉयफ्रेंड, तिच्या बर्थडेला दिले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:28 IST2021-07-26T17:27:21+5:302021-07-26T17:28:13+5:30
मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर बॉयफ्रेंडने दिलेले सरप्राईजमुळे दिव्या भारावून गेली होती.

'मुलगी झाली हो'मधील माऊचा खऱ्या आयुष्यात हा अभिनेता आहे बॉयफ्रेंड, तिच्या बर्थडेला दिले सरप्राईज
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेत माऊची भूमिका साकारली आहे अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर हिने. २१ जुलै रोजी दिव्याचा वाढदिवस असतो. या दिवशी मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांनी मिळून दिव्याचा वाढदिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या बॉयफ्रेंडने अचानक सेटवर येऊन दिव्याला सरप्राईज दिले. आपल्या बॉयफ्रेंडला समोर पाहून दिव्या भलतीच खुश झालेली पाहायला मिळाली या आनंदात तिने आपल्या बॉयफ्रेंडला घट्ट मिठी मारली.
मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर बॉयफ्रेंडने दिलेले सरप्राईजमुळे दिव्या भारावून गेली. तिचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर तिच्या या बॉयफ्रेंडचे नाव आहे अक्षय घरत. अक्षय घरत फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे.
अक्षय आणि दिव्या खूप आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.नुकत्याच झालेल्या दिव्याच्या वाढदिवसाला अक्षयने सेटवर येऊन तिच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केली होती यात तिच्या सहकलाकारांनी अक्षयला मदत देखील केली. दिव्याने सेटवर दिलेल्या अक्षयच्या या सरप्राईजला आजवर दिलेले सर्वात बेस्ट सरप्राईज आहे असे म्हणत अक्षयचे आभार मानले.
दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेच्या आधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा माऊची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिने साकारलेल्या माऊच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे.